Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस १९' मध्ये 'या' स्पर्धकाला मिळाले फक्त २ टक्के मते; मृदुल तिवारीनंतर घराबाहेर पडणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:43 IST

मृदुल तिवारीच्या आठवड्याच्या मध्यात झालेल्या एक्झिटनंतर, आता आणखी एक सदस्य घराबाहेर जाणार असल्याची चर्चा आहे. 

सुपरस्टार सलमान खानचा वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस १९' आता अंतिम टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे. अंतिम फेरीपासून अवघे चार आठवडे दूर असताना घरात धक्कादायक एलिमिनेशन सुरू झालं आहे. मृदुल तिवारीच्या आठवड्याच्या मध्यात झालेल्या एक्झिटनंतर, आता आणखी एक सदस्य घराबाहेर जाणार असल्याची चर्चा आहे. 

माहितीनुसार, या आठवड्यातील प्रेक्षकांच्या मतदानाचा आकडा समोर आला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, हा स्पर्धक याच आठवड्यात घराचा कॅप्टन देखील बनला आहे. तरीही 'बिग बॉस'ने त्याचे नॉमिनेशन रद्द केलं नाही. मृदुल तिवारीनंतर घराबाहेर पडणारा स्पर्धक आहे शहनाज गिलचा भाऊ शेहबाज बदेशा. 'बिग बॉस १९' च्या मतदान यादीनुसार शेहबाज बदेशाला सर्वांत कमी मते केवळ २ टक्के मते मिळाली. कुनिका सदानंद आणि अमाल मलिक यांना ३ टक्के मते मिळाली आहेत. कॅप्टन असूनही शेहबाज नॉमिनेट असल्यानं तो घरातून बाहेर पडणार असल्याचं बोललं जातंय.

गौरव-फरहानामध्ये चुरशीची लढतदरम्यान, या आठवड्यात सर्वाधिक मते मिळवणारे स्पर्धक कोण आहेत, याबद्दलही उत्सुकता आहे. गौरव खन्नाला २४ टक्के मते मिळाली असून तो सध्या टॉपवर आहे. तर  फरहाना भट्ट ही २३ टक्के मते मिळवून गौरव खन्नाला जोरदार चुरशीची लढत देत आहे. त्यांच्या पाठोपाठ अशनूर कौर, प्रणीत मोरे, तान्या मित्तल आणि मालती चहर हे स्पर्धकही मतदान यादीत सुरक्षित आहेत. शो अंतिम टप्प्यात पोहोचल्यामुळे, उर्वरित ९ सदस्यांचे चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मतदानात कोणताही बदल होऊ शकतो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, कॅप्टन असूनही शेहबाज बदेशावर एलिमिनेशनची तलवार लटकली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss 19: Shehbaz Badesha Faces Elimination with Lowest Votes?

Web Summary : Shehbaz Badesha may be eliminated from Bigg Boss 19 despite being captain, receiving only 2% of votes. Gaurav Khanna and Farahana Bhatt lead in votes as the show nears its finale.
टॅग्स :बिग बॉस १९टेलिव्हिजन