Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'चा गेल्या आठवड्यातील वीकेंड का वार हा रोहित शेट्टीने होस्ट केला. सलमान खान गैरहजर असल्याने रोहितने वीकेंड का वारमध्ये घरातील सदस्यांची शाळा घेतली. रोहित शेट्टीने त्याच्या 'खतरों के खिलाडी' या शोसाठी 'बिग बॉस १९'मधील एका स्पर्धकाला खुली ऑफर या वीकेंड का वारमध्ये दिली आहे. कोण आहे तो सदस्य? चला जाणून घेऊया.
रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी' हादेखील एक लोकप्रिय रिएलिटी शो आहे. या शोमध्ये सेलिब्रिटींना वेगवेगळे स्टंट करायचे असतात. या वर्षी खतरों के खिलाडीचा सीझन प्रसारित झाला नव्हता. मात्र, पुढच्या वर्षी खतरों के खिलाडीचा पुढचा सीझन येणार असल्याचं रोहित शेट्टीने स्वत: बिग बॉसच्या घरात सांगितलं आहे. अनेकदा 'बिग बॉस'च्या घरातील काही सदस्यांना रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीची ऑफर मिळते. आता 'बिग बॉस १९'च्या घरातील फरहाना भट हिला रोहित शेट्टीने खतरों के खिलाडीसाठी विचारलं आहे.
'बिग बॉस १९'च्या वीकेंड का वारमध्ये रोहित शेट्टीने घरातील सदस्यांसोबत एक गेम घेतला. यामध्ये घरातील सदस्यांना काही प्रश्न विचारले जाणार होते. त्यांच्या उत्तरानुसार त्यांना शॉक दिला जाणार होता. याच गेममध्ये रोहित शेट्टीने फरहानाला खतरों के खिलाडीची ऑफर दिली. फरहानाला रोहितने विचारलं की तू खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होशील का? फरहानाने लगेचच "हो" असं उत्तर दिलं. त्यामुळे आता खतरों के खिलाडीच्या पुढच्या सीझनमध्ये फरहाना दिसेल का हे पाहावं लागेल.
Web Summary : Rohit Shetty, hosting Bigg Boss, offered Farhana Bhat a spot on Khatron Ke Khiladi. During a game, he asked if she would participate, and she accepted. Her appearance remains to be seen.
Web Summary : बिग बॉस की मेजबानी कर रहे रोहित शेट्टी ने फरहाना भट को खतरों के खिलाड़ी में एक स्थान की पेशकश की। एक खेल के दौरान, उन्होंने पूछा कि क्या वह भाग लेंगी, और उसने स्वीकार कर लिया। उसका दिखना अभी बाकी है।