Bigg Boss 19 New Update: प्रेक्षकांचा आवडता रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा परत येत आहे. यावेळी 'बिग बॉस हिंदी'चे १९ वे पर्व आणखी भव्य ठरणार आहे. या शोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. यंदा सलमान खान एकटा नव्हे, तर आणखी तीन सेलिब्रिटींसोबत हा शो होस्ट करणार आहेत. त्यामुळे 'बिग बॉस १९' हा शो नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसाठी भरपूर नाट्य, ट्विस्ट्स, आणि सरप्राइजेस घेऊन येणार आहे. चला, जाणून घेऊया यावर्षीच्या 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमियरची (Bigg Boss 19 Premiere ) तारीख, वेळ, आणि संभाव्य स्पर्धकांची यादी!
'बिग बॉस'च्या १९ व्या सीझनची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढली आहे. यंदाचा सीझन पाच महिने चालणार आहे. इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, 'बिग बॉस १९' हे २९ किंवा ३० ऑगस्टपासून प्रसारित होणार आहे. या शोची अधिकृत घोषणा जुलै अखेरीस केली जाऊ शकते. हा सीझन आतापर्यंतचा सर्वात मोठा सीझन ठरण्याची शक्यता आहे.
सलमान खानसह हे ३ सेलिब्रिटी करणार होस्टिंगयंदाच्या सीझनसाठी सलमान खानने केवळ तीन महिन्यांचा करार केला आहे. त्यानंतर शोचं सूत्रसंचालन करण जोहर, फराह खान आणि अनिल कपूर हे करू शकतात. उर्वरीत दोन महिने एकच होस्ट असेल की वेळोवेळी होस्ट बदलले जातील, याबाबतचा अंतिम निर्णय कोर टीमकडून घेतला जाईल. पण, अखेरीस ग्रँड फिनाले होस्टिंग सलमान खानचं करेल.
ओटीटीवर आधी, मग टीव्हीवरयंदा 'बिग बॉस १९' हा सीझन 'डिजिटल फर्स्ट' असेल. नवीन भाग सर्वप्रथम जिओ सिनेमा/हॉटस्टारवर रिलीज केले जातील. त्यानंतर दीड तासांनी तोच भाग कलर्स टीव्हीवर प्रसारित केला जाईल. यामुळे ओटीटी दर्शकांना कंटेंट आधी पाहण्याची संधी मिळणार आहे.
कोण आहेत स्पर्धक?निर्मात्यांनी आतापर्यंत २० हून अधिक सेलिब्रिटी व इन्फ्लुएन्सर्सना संपर्क केला आहे. यात लता सभरवाल, आशिष विद्यार्थी, राम कपूर, अलिशा पनवार, मुनमुन दत्ता, चिंकी मिंकी, पुरव झा, कृष्णा श्रॉफ, फैसल शेख उर्फ मिस्टर फैजू, अनिता हसनंदानी, खुशी दुबे, गौरव तनेजा, गौतमी कपूर, धीरज धूपर, अपूर्व मुखिजा, तनुश्री दत्ता, शरद मल्होत्रा, ममता कुलकर्णी समावेश आहे.
सुरुवातीला १५ स्पर्धक, नंतर वाइल्ड कार्डशोच्या पहिल्या भागात सुमारे १५ स्पर्धक दिसतील, तर पुढे ३ ते ५ वाइल्ड कार्ड एन्ट्रीज होतील. सध्या ऑडिशन प्रक्रिया सुरु असून, काही स्पर्धकांचे करार अंतिम टप्प्यात आहेत.