Bigg Boss 19 Captain: 'बिग बॉस १९'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. या सीझनमधील अनेक स्पर्धक लक्ष वेधून घेत आहेत. 'बिग बॉस १९'चं घर एक युद्धभूमी बनलं आहे. या सगळ्यामुळे स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. बिग बॉसच्या घरात आतापर्यंत दोन कॅप्टन झालेत. आता तिसरा कॅप्टनही बिग बॉसला मिळालाय. तर कोण आहे, याबद्दलची माहिती एपिसोड प्रदर्शित होण्याआधीच समोर आली आहे.
कुनिका सदानंद ही घराची पहिली कॅप्टन बनली होती, पण तिने २४ तासांतच कॅप्टनसी सोडली. त्यानंतर बसीर अलीने एका आठवड्यासाठी घराची सत्ता सांभाळली. आता घराला एक नवीन कॅप्टन मिळालाय. माल मलिक हा नवीन कॅप्टन बनला आहे. कॅप्टनसी टास्कमध्ये अमाल आणि मृदुल तिवारी यांना समान मते मिळाल्याने बरोबरी झाली होती. पुन्हा मतदान झाल्यावर अमालची निवड करण्यात आली. आजच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळणार आहे.
कॅप्टनसी टास्कदरम्यान घरात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि घाणेरडी लढाई झाली. बसीर अली आणि अभिषेक बजाज यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. बसीरचा आरोप आहे की अभिषेकने त्याला ढकलले, ज्यामुळे तो संतापला आणि त्याने स्विमिंग पूलमध्ये क्लॅपबोर्ड फेकून दिला.
या आठवड्यात कोण होणार बाहेर?'बिग बॉस १९' च्या घरात एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश केला होता आणि एका वाइल्ड कार्ड स्पर्धकाच्या (शाहबाज बदेशा) प्रवेशानंतर ही संख्या १७ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांपासून घरातून कोणीही बाहेर पडलेले नाही. मात्र, या आठवड्यात नगमा, आवेज, मृदुल आणि नतालिया हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.