Join us

तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांची मैत्री तुटली, पुर्ण घर गेलं विरोधात, पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 13:58 IST

नीलम गिरीसोबतची मैत्री तुटल्यानंतर संपूर्ण घर तान्याविरुद्ध उभे राहिले आहे. 

'बिग बॉसच्या १९' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे. ड्रामा, भांडणं आणि बदलत्या नात्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष शोकडे वेधले जात आहे. 'बिग बॉसच्या १९'च्या घरात तान्या मित्तल आणि निलम गिरी यांच्यात पहिल्या दिवसापासून घनिष्ठ मैत्री पाहायला मिळत होती. पण, आता त्यांच्या मैत्रीत दरी आली आहे. ज्यामुळे संपूर्ण घर तान्याविरुद्ध उभे राहिले आहे. 

निर्मात्यांनी नुकत्याच जारी केलेल्या प्रोमोमध्ये तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांच्यातील मैत्री तुटल्याचं पाहायला मिळालं. या तणावाचे कारण ठरली आहे, स्पर्धक फरहाना भट्ट. नीलमचे फरहानाशी भांडण झालं होतं.  त्यामुळे ती तान्याला विचारते की, "ज्या व्यक्तीनं मला घरात सर्वात जास्त रडवलं, तिच्याशी तू का बोलत आहेस?". नीलमने हा प्रश्न उपस्थित करताच, घरातील इतर सदस्यांनीही तान्यावर निशाणा साधायला सुरुवात केली.

घरातील सदस्यांकडून सतत टोमणे आणि आरोप झाल्यानंतर तान्या मित्तलचा अखेर संयम सुटला. तिने ओरडून म्हटले की "मी रडत नाहीये आणि सर्वांच्या "कडू" टिप्पण्या शांतपणे ऐकत आहे". तिच्या या उद्रेकाने घरातील वातावरण अधिक तापले. हा प्रोमो पाहून काही चाहते खूप आनंदी झाले आहेत. नीलम गिरीने तान्या मित्तलचा "खोटारडेपणा" उघड करावा अशी त्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती. या आठवड्यात तान्या या सगळ्या आरोपांना कशी सामोरे जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tanya-Neelam's friendship ends; house turns against Tanya in Bigg Boss

Web Summary : Bigg Boss 19 witnesses a fallout between Tanya Mittal and Neelam Giri, escalating tensions. Neelam confronts Tanya about her interactions with Farhana, leading to accusations and a house divided. Tanya's emotional outburst intensifies the conflict, leaving viewers eager to see how she navigates the situation.
टॅग्स :बिग बॉस १९