Join us

'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:14 IST

'बिग बॉस १९'ची घोषणा झाली आहे, शोमध्ये कोण कोण सहभागी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

बिग बॉस १९ (Bigg Boss 19) ला लवकरच सुरुवात होणार आहे. सलमान खानच यंदाही होस्ट करणार आहे. नुकताच बिग बॉस १९ चा पहिला प्रोमोही समोर आला. शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांना ऑफर देण्यात आली आहे. त्यातली काही नावं समोरही आले आहेत. तर आता नवीन माहितीनुसार, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम शैलेश लोढा यांनाही विचारणा करण्यात आली आहे.

बिग बॉस ताजा खबरच्या रिपोर्टनुसार, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत तारक मेहता च्या भूमिकेत दिसलेले अभिनेता, लेखक शैलेश लोढा यांना 'बिग बॉस'च्या मेकर्सकडून विचारणा करण्यात आली आहे. शैलेश लोढा यांना 'बिग बॉस १९' ची ऑफर मिळाली आहे. अद्याप लोढा यांच्याकडून मात्र होकार किंवा नकार आलेला नाही. तसंच बिग बॉससारखे शो शैलेश लोढांची आवड नाही. त्यामुळे त्यांच्या नकाराचीच शक्यता जास्त आहे. तरी मेकर्स त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहेत.

दरम्यान, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये रोशन सोढीच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता गुरुचरण सिंह बिग बॉस १९ मध्ये येणार हे कन्फर्म झाले आहे. या सीझनचा पहिला स्पर्धक निश्चित झाला आहे. याशिवाय जर शैलेश लोढाही आले तर तारक मेहता शोची अनेक गुपितं बाहेर येण्याची शक्यता आहे. 

यंदा 'बिग बॉस'ची थीमही हटके

यंदा बिग बॉसच्या नव्या पर्वात बरीच वेगळी थीम राहणार आहे. राजकीय थीमवर आधारित यंदाचं पर्व असणार आहे. त्यामुळे  या शोमध्ये नक्की काय असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. हा 'बिग बॉस'चा नवा सीझन हा २४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो कलर्स टीव्हीवर रात्री १०.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. जिओ हॉटस्टारवरही हा शो तुम्ही पाहू शकता.

टॅग्स :सलमान खानतारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारबिग बॉस