Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मालती लेस्बियन आहे, मला खात्री...", दीपक चहरच्या बहिणीबाबत कुनिकाचं वक्तव्य, चाहते भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:32 IST

कुनिका आणि तान्याचा घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कुनिका मालतीच्या लैंगिकतेबद्दल बोलताना दिसत आहे. 

Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९' हे पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. आता घरातील सदस्यांचे खेळात टिकून राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गौरव खन्ना, कुनिका सदानंद, तान्या मित्तल, शहबाज, प्रणित मोरे, फरहाना, अमाल मलिक हे सदस्य पहिल्या दिवसापासून घरात आहेत. तर मालती चहरने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती. घरात रोज नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. आता कुनिका आणि तान्याचा घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कुनिका मालतीच्या लैंगिकतेबद्दल बोलताना दिसत आहे. 

या व्हिडीओत कुनिका तान्याला म्हणते, "मला खात्री आहे की मालती मॅडम लेस्बियन आहे. तिचे हावभाव आणि बोलण्याची पद्धतही तशीच आहे. तू लक्ष दे". कुनिकाचं वक्तव्य ऐकून तान्या आश्चर्यचकित झाल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून मालती आणि दीपक चहरचे चाहते भडकले आहेत. 

"हे खूप वाईट आहे...कुनिका सदानंद तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मी मालतीचा फॅन नाही किंवा ती कोण आहे यामुळे फरक पडत नाही. पण, बिग बॉस आणि कलर्सने तिच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे", असं एका चाहत्याने म्हटलं आहे. 

"कुनिकाने आज मालती चहर आणि अश्नूरला नॅशनल टीव्हीवर लेस्बियन म्हटलं. संपूर्ण सोशल मीडियाला धक्का बसला आहे", असंही एकाने म्हटलं आहे. कुनिकाने मालतीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चाहते दुखावले आहे. एखाद्याच्या लैंगितेबद्दल बोलण्याचा कुनिकाला अधिकार नाही, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss 19: Kunika's comment on Malti Chahar sparks outrage.

Web Summary : In Bigg Boss 19, Kunika's comment about Malti Chahar being lesbian has caused controversy. Fans are angered by Kunika's remarks regarding Malti's sexuality, deeming them inappropriate.
टॅग्स :बिग बॉस १९टिव्ही कलाकार