Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 19 Grand Finale: 'बिग बॉस १९' ग्रॅण्ड फिनाले रंगणार या दिवशी? कोण ठरणार या पर्वाचा महाविजेता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:07 IST

Bigg Boss 19 Grand Finale: 'बिग बॉस १९' आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. फिनालेसाठी आता काही दिवस उरले आहेत आणि प्रेक्षकांमध्येही चांगलीच उत्सुकता आहे.

'बिग बॉस १९' आता त्याच्या अंतिम आणि सर्वात रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. फिनालेसाठी उलटगणती सुरू झाली आहे आणि या सीझनचा विजेता कोण ठरणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता आहे. संपूर्ण सीझनमध्ये झालेल्या भांडणं, मैत्री, गेम-प्लॅन, भावनिक क्षण आणि अनेक धक्कादायक ट्विस्ट्सने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. आता हा शो हळूहळू अंतिम टप्प्याकडे सरकत आहे आणि चाहत्यांमध्ये ट्रॉफीबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.

फिनाले वीकमध्ये बिग बॉस एक मोठा ट्विस्ट घेऊन आले आहेत. यावेळी मिड-वीकमध्ये एका स्पर्धकाला घराबाहेर काढले जाईल, ज्यामुळे त्याला टॉप ५ मध्ये पोहोचण्याची संधी गमवावी लागेल. जिओ हॉट स्टारवर मिड-वीक एलिमिनेशनसाठी वोटिंग सुरू झाली आहे आणि प्रेक्षक त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला वाचवण्यासाठी २ डिसेंबर २०२५ सकाळी १० वाजेपर्यंत वोट करू शकतात. दरम्यान, गौरव खन्ना याने आधीच 'तिकीट टू फिनाले' जिंकून फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तो सध्या एकमेव सुरक्षित स्पर्धक आहे, तर बाकीच्यांवर नॉमिनेशनची लटकती तलवार आहे.

टॉप ५ फायनलिस्ट कोण असू शकतात?मिड-वीक एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झालेल्या पाच स्पर्धकांमध्ये फरहाना भट्ट, अमाल मलिक, मालती चाहर, प्रणित मोरे आणि तान्या मित्तल यांचा समावेश आहे. परफॉर्मन्स आणि प्रवासाच्या आधारावर पाहिल्यास, मालती चाहर हिला इतर स्पर्धकांच्या तुलनेत कमकुवत मानले जात आहे. अशा परिस्थितीत, असा अंदाज आहे की ती मिड-वीक एविक्ट होऊ शकते. यानंतर शोला गौरव खन्ना, फरहाना भट्ट, अमाल मलिक, प्रणित मोरे आणि तान्या मित्तल हे संभाव्य टॉप ५ फायनलिस्ट मिळू शकतात.

ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहू शकता?ग्रँड फिनाले रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:३० वाजता कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तर ओटीटी लाईव्ह स्ट्रीमिंग रात्री ९ वाजता जिओ हॉट स्टारवर असेल. 'बिग बॉस १९' ची ट्रॉफी कोण जिंकणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss 19 Grand Finale: Date, Top 5, and Winner Prediction

Web Summary : Bigg Boss 19 nears its finale with mid-week eviction twist. Voting is open until December 2nd. Khanna secured a spot. Speculation surrounds potential top 5: Bhat, Malik, Chahar, More, Mittal. Finale airs December 7th on Colors and Jio Hotstar.
टॅग्स :बिग बॉस १९