'बिग बॉस हिंदी'नंतर मराठमोळ्या प्रणित मोरेची क्रेझ वाढली आहे. प्रणितने 'बिग बॉस'मधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर प्रणितच्या चाहत्यावर्गात वाढ झाली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रणितने खुलासा केला की त्याला मुलींचे खूप मेसेज येत आहे. इतकंच नव्हे तर एका मुलीने लग्नासाठी तिचा बायोडेटा पाठवल्याचा खुलासाही प्रणितने केला आहे.
प्रणितने लोकशाही या वृत्तवाहिनीला मुलाखतीत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "मला मुलींचे खूप मेसेज येतात ही तर खरी गोष्ट आहे. पण, मला वाटलं नव्हतं की एवढे मेसेज येतील. आता तर मुलींचे मेल वगैरे पण यायला लागले आहेत. एका मुलीने तर मला तिची पत्रिका पाठवली होती. मुलीचा बायोडेटा बघून आई खूश झाली. मुलींचे मेसेज तर येतात. पण, मला असं वाटतं की जिथे मी काम करतो तिथे या गोष्टी नकोत. म्हणून शोमध्ये पण मी कधी असा लव्ह अँगल वगैरे खेळेन असा विचार केलेला नव्हता. म्हणून ती रील पाहिल्यानंतर (मालतीसोबतची) माझं असं होतं की हे काय केलंय... बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरही आता मला असं वाटतंय की जे लोक मला कामासाठी पसंत करतात. त्यांच्यासोबत मला या गोष्टी नाही करायचा".
प्रणित हा 'बिग बॉस १९'मधला चर्चेतला चेहरा होता. सुरुवातीला 'बिग बॉस'च्या घरात शांत दिसणाऱ्या प्रणितने नंतर मात्र त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली. 'बिग बॉस'च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये त्याने स्थान मिळवलं होतं. 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीचा तो दावेदार मानला जात होता. मात्र त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
Web Summary : Post 'Bigg Boss', Pranit More is flooded with messages, including marriage proposals. One fan even sent her biodata, delighting his mother. Pranit prefers to keep his work separate from romantic angles.
Web Summary : बिग बॉस के बाद, प्रणीत मोरे को शादी के प्रस्तावों समेत कई मैसेज आ रहे हैं। एक फैन ने तो अपना बायोडाटा भी भेज दिया, जिससे उनकी मां खुश हो गईं। प्रणीत अपने काम को प्रेम प्रसंगों से अलग रखना पसंद करते हैं।