Malti Chahar: भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मालती चहर 'बिग बॉस १९' च्या पर्वात दिसली. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत आहे. या पर्वात लोकप्रिय गायक अमाल मलिक देखील सहभागी झाला होता. दरम्यान, त्यानंतर आता ती अमल मलिकला डेट करत आहे, अशा चर्चा सगळीकडे वाऱ्यासारख्या पसरल्या. आता मालतीने या डेटिंगच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.
'बिग बॉस' हिंदीच्या घरात मालती आणि अमाल यांच्यामध्ये छान मैत्रीच नातं पाहायला मिळालं. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्या नात्याला प्रेमाचं नाव देण्यात आलं. या सगळ्या चर्चांना आणि दोघांमधील नात्याबद्दल मालतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूर्णविराम दिला आहे. तिने या पोस्टद्वारे स्पष्ट केले की, त्याचे अमलसोबत कधीही प्रेमसंबंध नव्हते. शिवाय तिने हेही मान्य केलं की, अमालने तिचा नंबर मागितला होता आणि ते फक्त एकदाच भेटले होते. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय," एक गोष्ट मी स्पष्ट करु इच्छिते की,अमाल आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिलेशनशिप नाही. अमलने फक्त माझा फोन नंबर घेतला होता आणि आम्ही एकदाच भेटलो होतो."
त्या चर्चांना दिला पूर्णविराम...
यानंतर मालतीने सांगितलं,"या भेटीदरम्यान आम्ही काही वैयक्तिक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या, आणि त्यानंतर आम्ही फोनच्या माध्यमातून संपर्कात असायचो. याशिवाय आमच्यात दुसरं काहीही घडलं नाही. सोशल मीडियावर जे काही पसरवलं जात आहे, ती माहिती पूर्णपणे खोटी आहे. आता हे सगळं थांबवलंच पाहिजे.त्याने शोच्या आधी आणि शोदरम्यान काही वेळा त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल सांगितलं होतं. मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली आणि नंतर मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला.आता मलाच त्याचा पश्चात्ताप होत आहे. बस, इतकंच, दुसरं काही नाही. कृपया आता मला एकटं सोडा. कृपया, माझं नाव त्याच्याशी जोडू नका. धन्यवाद...." , अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.