टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९'ची रंगत दिवसगणिक वाढतच चालली आहे. सलमान खान होस्ट असलेल्या या शोमध्ये रोज काही ना काही घडतच असतं. आज २४ ऑक्टोबर २०२५ रोजी नवा कॅप्टन निवडला जाणार आहे. कॅप्टनपदाच्या निवडणुकीसोबतच घरात अनेक हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. नेहलनंतर 'बिग बॉस १९'चा नवा कॅप्टन कोण, जाणून घेऊयात.
'बिग बॉस १९'चा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळतं की बिग बॉसनकडून सर्व स्पर्धकांना असेंब्ली रूममध्ये एकत्र बोलावलं जातं आणि कॅप्टन निवडण्यास सांगितलं जातं. कॅप्टनपदासाठी विविध स्पर्धकांनी एकमेकांची नावे सुचवली, ज्यामुळे घरात नवी समीकरणे पाहायला मिळाली.
बसीरने कॅप्टनसाठी नेहल आणि अमालचं नाव घेतलं. तर अभिषेकने प्रणित आणि अशनूरचं नाव घेतलं. नेहलने बसीर आणि कुनिकाला पाठिंबा दिला. गौरव खन्नाने प्रणितचं नाव घेतलं. तर अशनूरने अभिषेक आणि प्रणितचं नाव घेतले. फरहानाने गौरव खन्नामध्ये नेतृत्वगुण असल्याचे सांगितले. अमालने मृदुल एक चांगला कॅप्टन असू शकतो, असे मत व्यक्त केले. शुक्रवारी रात्रीच्या एपिसोडमध्ये या आठवड्याचा कॅप्टन कोण निवडला जातो हे उघड होईल. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, मृदुल तिवारी घराचा नवीन कॅप्टन बनला आहे.
कॅप्टन निवडणुकीसोबतच अमाल मलिक (Amaal Mallik) आणि तान्या मित्तल (Tanya Mittal) यांच्या मैत्रीत मोठा दुरावा निर्माण झाल्याचे दुसऱ्या प्रोमोमध्ये दिसून आले. अमाल आणि तान्यामधील भांडण इतके वाढले की, अमालने तान्यावर मोठे आरोप केले. तर दुसरीकडे घरातील तणाव कमी करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा स्पर्धक प्रणित मोरेने आपल्या खांद्यावर घेतली. त्याने आपल्या विनोदाने घरातील सदस्यांना हसण्यास भाग पाडले आणि वातावरण हलके केले. कॅप्टन निवड प्रकिया आणि प्रणितची कॉमेडी यामुळे आजचा एपिसोड अत्यंत मनोरंजक ठरणार आहे.
Web Summary : Bigg Boss 19 heats up! Mridul Tiwari is the new captain. Drama unfolds with nominations and friendship rifts. Pranit's humor lightens the mood.
Web Summary : बिग बॉस 19 में धमाल! मृदुल तिवारी बने नए कप्तान। नामांकन और दोस्ती में दरार से ड्रामा। प्रणित के हास्य से माहौल हुआ हल्का।