Join us

Bigg Boss 19: तब्बल १९ वर्षांनंतर अर्शद वारसीची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री, सलमानला करणार रिप्लेस, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:52 IST

बिग बॉसचं पहिलं पर्व होस्ट केलेला अर्शद वारसी हा बिग बॉस १९मध्ये दिसणार आहे. तब्बल १९ वर्षांनी अर्शद वारसी पुन्हा एकदा शोचं सूत्रसंचालन करणार आहे. 

Bigg Boss 19: बिग बॉस १९ हे पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. घरातील प्रत्येक सदस्य शोमध्ये टिकून राहण्यासाठी युक्त्या लढवताना दिसत आहे. यंदाच्या पर्वात अनेक गोष्टी बदललेल्या दिसल्या. आता आणखी एक सरप्राइज चाहत्यांना मिळणार आहे. बिग बॉसचं पहिलं पर्व होस्ट केलेला अर्शद वारसी हा बिग बॉस १९मध्ये दिसणार आहे. तब्बल १९ वर्षांनी अर्शद वारसी पुन्हा एकदा शोचं सूत्रसंचालन करणार आहे. 

अर्शद वारसी वीकेंड का वारमध्ये सलमान खानला रिप्लेस करणार आहे. यंदाच्या आठवड्यात सलमान वीकेंड का वारमध्ये दिसणार नाही. सलमान खान सध्या त्याच्या बॅटल ऑफ गलवानच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे यंदाचा वीकेंड का वार अर्शद वारसी होस्ट करणार आहे. त्याच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि सौरभ शुक्लादेखील असणार आहे. जॉली एलएलबी ३ या  सिनेमाच्या प्रमोशनसाठी ते बिग बॉसमध्ये येणार आहेत. 

अर्शद वारसीने २००६मध्ये बिग बॉस १ हा सीझन होस्ट केला होता. आता पुन्हा १९ वर्षांनी बिग बॉस होस्ट करण्यावर तो म्हणाला, "बिग बॉसमध्ये सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीच करावं लागत नाही. जे काही करायचं ते घरातील सदस्यच करत असतात. एका मिनिटाला ते बेस्ट फ्रेंडस असतात तर दुसऱ्या मिनिटाला ते घटस्फोट घेण्यासाठी तयार असतात. बिग बॉस पाहताना मी एन्जॉय करतो. पण यावेळेस १९ वर्षांनी मी अक्षयसोबत बिग बॉस होस्ट करणार आहे. त्यामुळे आणखी मजा येईल. अक्षय खूप स्पष्टपणे बोलतो आणि मी मस्करी करतो. त्यामुळे यंदा सदस्यांसाठी डबल ट्रबल असणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस १९सलमान खानअर्शद वारसी