Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तान्या माझ्यासोबत फ्लर्ट करायची", 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अभिषेकने केली पोलखोल, म्हणाला- "ती माझा हात पकडून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 09:29 IST

अभिषेकने घरात असताना तान्या त्याच्यासोबत फ्लर्ट करते, असं सगळ्यांसमोर म्हटलं होतं. तेव्हा घरातील सदस्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. आता अभिषेकने घरातून बाहेर पडताच तान्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'मध्ये गेल्या आठवड्यात डबल एलिमिनेशनमध्ये अभिषेक बजाजला घरातून एक्झिट घ्यावी लागली. बिग बॉसमधून बाहेर येताच अभिषेक बजाजने तान्या मित्तलची पोलखोल केली आहे. अभिषेकने घरात असताना तान्या त्याच्यासोबत फ्लर्ट करते, असं सगळ्यांसमोर म्हटलं होतं. तेव्हा घरातील सदस्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. आता अभिषेकने घरातून बाहेर पडताच तान्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 

अभिषेक बजाजने 'पिंकविला'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला तान्या खरंच तुझ्यासोबत फ्लर्ट करायची का? असं विचारल्यावर तो म्हणाला, "ते खरंच घडत होतो म्हणून मी बोललो. कोणती गोष्ट जर एकदा दोनदा तीनदा घडत असेल तर तुम्हाला वाटतं की ती नॉर्मल आहे. पण, पहिल्या दिवसापासून ती गोष्ट सतत घडत असेल. ती सगळ्यांसमोर माझा अपमान करायचा प्रयत्न करायची. आणि एकट्यात ती प्रत्येकवेळी  माझं कौतुक करायची. हा डबल गेम मला समजत नाही. त्यामुळेच मी घरात सगळ्यांसमोर हे बोललो. मी सांगितलं की ती कशी माझ्यासोबत बोलायची". 

"ती मला म्हणायची की तू या घरातला सगळ्यात हँडसम मुलगा आहेस. मला तुझ्यासोबत सिनेमा करायचा आहे. असं तिने खूप वेळा माझं कौतुक केलं. तिची बॉडीलँग्वेज ज्याप्रकारे असायची...म्हणजे माझा हात पकडून ती बोलायची. त्यामुळे या गोष्टी समजून येतात. मी पहिलं हे सगळं बोललो नाही कारण ती सगळ्यांसमोर माझा अपमान करत नव्हती. पण, नंतर मला तिचा गेम कळला. ती सगळ्यांसमोर हे दाखवायची की मी अभिषेकच्या विरोधात आहे आणि एकट्यात ती माझं कौतुक करायची. तिने फरहानाला सांगितलं होतं की जर अभिषेक अश्नूरसोबत खेळला नाही तर मी त्याच्यासाठी सगळं काही करेन. तू एकट्यात भेटत नाहीस. आपलं कधी बोलणंच होत नाही, हे सगळं ती मला बोलायची. ती खूप मॅनिप्यूलेटिव्ह आहे. त्यामुळे मी अशा लोकांसोबत मैत्री नाही करू शकत", असंही अभिषेक पुढे म्हणाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek exposes Tanya's flirting post Bigg Boss exit: 'She held my hand...'

Web Summary : Evicted Bigg Boss contestant Abhishek Bajaj reveals Tanya Mittal flirted with him. He claims she praised him in private, held his hand, and offered film roles, while publicly criticizing him. He calls her manipulative.
टॅग्स :बिग बॉस १९टिव्ही कलाकार