Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस हिंदी'च्या घरात एन्ट्री घेणार मराठी मुलगी ? जाणून घ्या कोण आहे 'ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 11:17 IST

बहुचर्चित 'बिग बॉस १८' ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळतेय.

Bigg Boss 18: बहुचर्चित 'बिग बॉस १८' ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळतेय. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आणि स्पर्धकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी बिग बॉस सज्ज आहे. यंदाच्या पर्वात कोण कोण सहभागी होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. आता एकापाठोपाठ एक स्पर्धकांच्या नावे समोर येत आहेत. यातच आता एक अभिनेत्री सलमान खानच्या 'हिंदी बिग बॉस'मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 

टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' येत्या 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. माहितीनुसार,  या सीझनमध्ये एक सौंदर्यवती सहभागी होणार आहे. ती म्हणजे मराठमोळी 'रंगीला गर्ल' अर्थात उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar). सोशल मीडियावर एक ट्विटर हँडल 'बिग बॉस तक'नं लेटेस्ट ट्वीटमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.पण, याबाबत अद्याप उर्मिलाने कोणतेही भाष्य केलेले नाही. 

उर्मिला मातोंडकर सध्या पती मोहसीनपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्मिलानं लग्नाच्या 8 वर्षानंतर पती मोहसीनपासून वेगळं होण्यासाठी घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. मोहसीन हा उर्मिलापेक्षा वयाने लहान आहे. मात्र तरीही दोघांनी वय आणि धर्माची बंधने तोडून एकमेंकाना निवडलं होतं. पण अखेर आता दोघे वेगळे होत असल्याचे बोलले जात आहे. 

उर्मिला किंवा मोहसीन या दोघांनीही घटस्फोटाच्या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या उर्मिला ही चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. शिवाय, काही दिवसांपूर्वी उर्मिलानं राजकारणातही एन्ट्री केली होती. आता ती 'हिंदी बिग बॉस'मध्ये जाणार का हे पाहणे प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे. 

टॅग्स :उर्मिला मातोंडकरसलमान खानबिग बॉस