Join us

Bigg Boss मध्ये येण्यापूर्वी आमचं कडाक्याचं भांडण झालं, नम्रताच्या आठवणीत शिल्पा भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 14:02 IST

बिग बॉस मध्ये प्रवेश करण्याआधी शिल्पाचं बहिणीसोबत कडाक्याचं भांडणं झालं होतं असा तिने नुकताच खुलासा केला. 

९० च्या दशकातील सुंदर आणि गुणी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) सध्या बिग बॉस १८ मुळे चर्चेत आहे. अनेक वर्षांपासून काम न मिळाल्याने शिल्पाने यावेळी बिग बॉस चा मार्ग अवलंबला. शिल्पा ही नम्रता शिरोडकरची बहीण आहे. साऊथ सुपरस्टार महेश बाबूची ती मेहुणी आहे. मात्र शिल्पाची ओळख सध्या इतकीच राहिली असल्याने तिने बिग बॉसमध्ये येऊन पुन्हा स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं. बिग बॉस मध्ये प्रवेश करण्याआधी शिल्पाचं बहिणीसोबत कडाक्याचं भांडणं झालं होतं असा तिने नुकताच खुलासा केला. 

बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये अनुराग कश्यप शोमध्ये आला असून तो सर्व स्पर्धकांशी गप्पा मारतो. अनुराग शिल्पाला विचारतो, 'लोक तुला डिप्लोमॅटिक म्हणतात. यावर तुला काय वाटतं?' शिल्पा म्हणते, 'माझी घरची माणसं नाहीत ना जे माझा हात धरुन ठेवतील. मी आमच्या घरात सर्वाच छोटी आहे.' यावर अनुराग कश्यप विचारतो की नम्रता तुझ्यापेक्षा मोठी आहे? तिच्याविषयी काय वाटतं तुला? यावर शिल्पा म्हणते, "बिग बॉस मध्ये यायच्या आधी माझं तिच्यासोबत मोठं भांडण झालं होतं. दोन आठवडे आम्ही एकमेकींशी बोललोही नाही. मला तिची खूप आठवण येते. ती भेटायला आली तर मला खूप बरं वाटेल."

शिल्पा शिरोडकर ५१ वर्षांची असून नम्रता ही तिच्याहून एकच वर्ष मोठी आहे. दोघी बहि‍णींनी बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं. लग्नानंतर माझं दोघींनी करिअर सोडलं. शिल्पाने २००० साली  अपरेश रणजितसोबत लग्नगाठ बांधली. त्यांना अनुष्का ही मुलगी आहे. तर नम्रताने २००५ साली महेशबाबू सोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

टॅग्स :शिल्पा शिरोडकरनम्रता शिरोडकरबिग बॉस