Bigg Boss 18 शोची सध्या चांगलीच चर्चा आहे. सलमान खान त्याच्या खास स्वॅगमध्ये Bigg Boss 18 च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळतोय. Bigg Boss 18 सुरु होताच सलमानला बिष्णोई टोळीकडून धमक्यांचे फोन आले. त्यानंतरही सलमानने कोणाच्याही धमक्यांना न घाबरता Bigg Boss 18 चं सूत्रसंचालन सुरुच ठेवलं. अशातच Bigg Boss 18 वर स्क्रीप्टेड असल्याचा आरोप लागला आहे. घरातील स्पर्धक ईशा सिंहचा फोटो व्हायरल झालाय. तिच्या हातात स्क्रीप्ट असलेलं दिसलं. पण या व्हायरल फोटोमागील सत्य वेगळंच असल्याचं दिसतंंय.
Bigg Boss 18 मधील फोटो व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. या फोटोत Bigg Boss 18 च्या घरातील स्पर्धक ईशा सिंह जेवता जेवता एक कागद समोर ठेऊन वाचताना दिसते. या कागदावर काहीतरी लिहिलेलं दिसतं. ईशा सिंहचा हा फोटो व्हायरल होताच ती Bigg Boss 18 विषयीची स्क्रीप्ट वाचते, अशी बातमी पसरली. परंतु ही अफवा असल्याचं स्पष्ट झालंय. ही Bigg Boss 18 ची स्क्रीप्ट नसून बिग बॉसच्या घरात खेळल्या जाणाऱ्या आगामी गेमची ही स्क्रीप्ट आहे. ईशा याच खेळाची स्क्रीप्ट वाचताना दिसतेय.
व्हायरल फोटोमागचं सत्य
मीडिया रिपोर्टसनुसार ईशा सिंह रविवारी होणाऱ्या वीकेंड का वार एपिसोडसाठी होणाऱ्या खास गेमसाठी तयारी करताना दिसली. या वीकेंड का वारमध्ये रॅपर इक्का सिंह आणि रफ्तार सहभागी होणार आहेत. ‘हसल 4: हिप-हॉप डोंट स्टॉप’ या शोचं प्रमोशन करण्यासाठी दोघं येणार आहेत. त्यावेळी खास सेगमेंट होणार असून ईशा सिंह त्यासाठी कागदावर लिहिलेला मजकूर वाचत होती, याचा खुलासा झालाय.