Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस १८'च्या ग्रँड फिनालेची धमाकेदार सुरुवात, 'हे' आहेत टॉप ६

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 21:47 IST

'बिग बॉस १८'चा ग्रँड फिनाले सोहळा नेहमीप्रमाणे दिमाखदार आहे.

Bigg Boss 18 Grand Finale: 'बिग बॉस' १८ च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची डॅशिग एन्ट्री आणि अनोखा स्वॅग प्रेक्षकांना चांगलाच भुरळ घालतोय.  ''बिग बॉस १८' च्या टॉप ६ मध्ये अभिनेता विवियन डिसेना, करणवीर मेहरा, ईशा सिंग, अविनाश मिश्रा, चुम दरंग आणि रजत दलाल  यांनी जागा मिळवली.

'बिग बॉस १८'चा ग्रँड फिनाले सोहळा नेहमीप्रमाणे यंदाही दिमाखदार आहे.  फिनालेला सुरुवात होताच घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबाचे व्हिडीओ दाखवण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी स्पर्धकांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या 'बिग बॉस १८'चा ग्रँड फिनाले तब्बल सहा तास चालणार आहे. संध्याकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत फिनाले रंगणार आहे. अनेक सेलिब्रिटी फिनालेमध्ये येणार आहेत. तर १२ वाजता 'बिग बॉस' १८ चा विजेता घोषित होणार आहे.

'बिग बॉस १८'चा प्रिमियर वकील गुणरत्न सदावर्तेंनी चांगलंच गाजवला होता. पण महाअंतिम सोहळ्याला सदावर्ते गैरहजर राहिले. तसंच वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झालेला दिग्विजय राठीसुद्धा महाअंतिम सोहळ्याला अनुपस्थित राहिला आहे. पण, उर्वरित सदस्य  उपस्थित राहिले. 'बिग बॉस १८'चा प्रिमियर हा ६ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसारित झाला होता. या सीझनमध्ये १८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर काही स्पर्धकांना 'बिग बॉस'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीही मिळाली होती. आता शोमध्ये फक्त ६ स्पर्धक उरले आहेत, ज्यांनी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलं आहे. जे बिग बॉस ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्नात आहेत. 'बिग बाॅस १८'च्या बक्षीस रकमेबद्दल बोलताना मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सीझनच्या विजेत्याला आकर्षक ट्रॉफीसह सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचा चेक दिला जाऊ शकतो.  आता चाहत्यांचं कोण ट्रॉफी उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीसलमान खान