Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17 शो मध्येच सोडणार अंकिता लोखंडे?, ढसाढसा रडली; म्हणाली - "मी एकटी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 11:26 IST

Bigg Boss 17: बिग बॉस १७ शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. दरम्यान आता अंकिता लोखंडेला हा शो सोडून जायचा आहे.

बिग बॉस १७ शोची सुरुवात धमाकेदार झाली आहे. यंदा शोमध्ये एकापेक्षा एक दमदार स्पर्धक सहभागी झाले आहेत.  यात अंकिता लोखंडे, विकी जैन, नील भट, ऐश्वर्या शर्मा, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, सनी आर्य, अनुराग ढोबाल, जिग्ना वोरा, मुनव्वर फारुकी, फिरोजा खान उर्फ खानजादी, मन्नारा चोप्रा, नवीद सोले, रिंकू धवन, अरुण श्रीकांत, सना रईस खान आणि सोनिया बन्सल यांचा समावेश आहे. अंकिता लोखंंडे-विकी जैन ही जोडी सध्या खूप चर्चेत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत पाहायला मिळालं की, अंकिता विकीपासून त्रस्त आहे आणि म्हणताना दिसतेय की, तो घरात सगळीकडे आहे, पण तिच्यासोबत नाही. 

बिग बॉस १७च्या प्रोमोत अंकिता लोखंडे आणि विकी जैन बेडरुममध्ये बोलताना दिसत आहेत. डोळ्यात पाणी असलेली अंकिता त्याला सांगतेय की, त्यांनी कशी एकमेकांशी चर्चा केली होती की बिग बॉसच्या घरात एकत्र राहू. पण तसं झालं नाही. पुढे ती म्हणताना दिसते की, मला जग दुखावू शकत नाही, मला फक्त माझा व्यक्तीला दुखावू शकतो आणि मी दुखावले आहे. हे पाहून विकी लगेच अंकिताला सॉरी म्हणाला आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करु लागला. 

ढसाढसा रडू लागली अंकिताजेव्हा विकी अंकिताला शांत करण्याचा प्रयत्न करु लागला तेव्हा ती रडू लागली. ती म्हणाली की, मला माहित नाही मला खूप एकटं वाटत आहे. तू प्रत्येक ठिकाणी आहेस विकी. फक्त माझ्यासोबत नाही. मला वाटत आहे...मला माहित नाही की, मला इतकंं एकटं का वाटतंय... लाइव्ह व्हिडीओत अंकिताला सांगताना पाहिले की, तो नवीन लोकांना भेटतो आणि जुन्या लोकांना विसरुन जातो. मला आता घरी जायचंय. त्याला फक्त गेम खेळू देते कारण तो शोमधील सर्वात चांगला स्पर्धक आहे. 

खरेतर विकी गेम खेळात खूप सहभागी होतो आणि तसेच तो सगळ्यांमध्ये मिसळून जातो. टास्क खेळण्यासाठीदेखील तो उत्सुक असतो. मात्र अंकिता वास्तविकमध्ये पूर्ण वेगळी आहे.

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडे