Join us
Daily Top 2Weekly Top 5

२ दिवसातच Bigg Boss 17च्या या स्पर्धकावर फिदा झाला ओरी, म्हणाला - "मी तिच्यासोबत...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:10 IST

Orry : बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ओरीने त्याच्या आवडत्या स्पर्धकांबाबत खुलासा केला आहे.

लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी टीव्ही शो बिग बॉस १७ (Bigg Boss 17) सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रेक्षकांची यंदाच्या सीझनला खूप पसंती मिळत आहे. अशा परिस्थितीत, निर्माते देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी शोमध्ये काहीतरी नवीन करत आहेत. या वीकेंडला ओरी(Orry)च्या एंट्रीमुळे शोमध्ये एक नवा ट्विस्ट आला. सेलेब्सचा बेस्ट फ्रेंड ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ओरीने या शोमध्ये प्रवेश केला होता. ओरी या शोमध्ये फक्त दोन दिवस राहिला पण या दोन दिवसांत ओरीने सदस्यांशी चांगले रिलेशन बनवले.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ओरीने त्याच्या आवडत्या स्पर्धकांचा खुलासा केला आहे. त्याने अलीकडेच ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याचा बिग बॉसचा अनुभव शेअर केला. ओरीने सांगितले की, मला असे वाटले की मी कोणत्या तरी पेंटिंगमध्ये किंवा कोणत्यातरी चित्रपटात आहे. जेव्हा मी घराच्या आत जात होतो तेव्हा माझ्या डोळ्यावर पट्टी होती. एखाद्या जादुई दुनियेत आल्यासारखे वाटले. मला तिथं वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी पात्रं भेटली. त्या सर्वांबद्दल जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता होती.

अंकिता लोखंडे बनली ओरीची फेव्हरेटओरीने पुढे घरातील त्याच्या बाँडिंगबद्दल सांगितले. यादरम्यान त्याने सांगितले की त्याला अंकिता लोखंडे खूप आवडते. ओरी म्हणाला की, मला अंकिता आवडते...आम्ही खूप वेळ एकत्र घालवला. घरातून बाहेर पडताना मी मिठी मारलेली ती पहिली आणि शेवटची व्यक्ती होती. ती घरातली पहिली व्यक्ती होती जिने माझ्यासाठी काहीतरी बनवले.

ओरी पुढे म्हणाली की अंकिताने त्याच्यासाठी चहा बनवला आणि तिच्या वाट्याचे सामानही दिले, ती बिग बॉसच्या घरात खूप चांगली आहे, ती सर्वांसाठी मनापासून करते. त्यांनी माझे तिथे खूप छान स्वागत केले. नवोदित असल्यामुळे अंकिताने ज्या प्रकारे माझी काळजी घेतली आणि माझे स्वागत केले ते कौतुकास्पद होते.

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडे