Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17 : विकी जैनला मारण्यासाठी अंगावर धावून गेला नील भट, मध्यरात्री घरात हायवोल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 10:48 IST

Bigg Boss 17 : सलमान खानचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस १७ मध्ये पहिल्या दिवसापासून जोरदार भांडणं पाहायला मिळत आहेत. शो सुरू होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत, पण घरात अनेक भांडणं झाली आहेत.

सलमान खानचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस १७ मध्ये पहिल्या दिवसापासून जोरदार भांडणं पाहायला मिळत आहेत. शो सुरू होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत, पण घरात अनेक भांडण झाली आहेत. अभिषेक कुमारने जवळपास प्रत्येक स्पर्धकाशी भांडणं केली आहेत. तर विकी जैननेही त्याच्या ओव्हरस्मार्टनेसमध्ये अनेक चुका केल्या आहेत. बिग बॉसमध्ये नील भट आतापर्यंत शांत होता, पण आता तो संतापला आहे. बिग बॉसच्या घरात नील भट आणि विकी जैन यांच्यात जोरदार भांडण झाले. या प्रसंगाचा प्रोमो समोर आला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे.

बिग बॉस १७चा नवीन प्रोमो समोर आला आहे, जो खूप दमदार आहे. या प्रोमोमध्ये सर्वप्रथम अंकिता लोखंडे आणि खानजादी यांच्यात वाद झाला आहे. खानजादी म्हणजेच फिरोजा खान अंकिता लोखंडेच्या प्रोफेशनवर कमेंट करते, ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. यादरम्यान अंकिता खानजादीला खूप काही सांगते. अंकिता आणि खानजादी यांच्यातील भांडण संपवण्यासाठी विकी जैन पुढे येतो. तो अंकितालाही परत घेऊन जातो. तेवढ्यात नील भटही तिथे पोहोचला, पण विकी त्याला बाजूला ठेवतो. विकीही त्याला मागे राहण्यास सांगतो, त्यामुळे नीलला राग आला. या कारणावरून तो विकी जैनसोबत भांडला. दोघांमधील वाद इतका वाढला की नील विकीला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून जातो, पण ऐश्वर्या शर्मा त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे.

बिग बॉस १७चा हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर लोक अंकिता लोखंडेचे कौतुक करत आहेत, पण नील भटला ट्रोल करत आहेत. अनेक युजर्सनी अंकिता लोखंडेचे नाव लिहून त्यासमोर हार्टच्या वेगवेगळ्या छटांचे इमोजी लावले आहेत. याशिवाय नील आणि विकी जैन यांनाही वेडे म्हटले जात आहे.

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडे