Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'च्या घरात चाललंय तरी काय? लाईट बंद होताच ईशा-समर्थचा सदस्यांसमोरच खुलेआम रोमान्स, लिपलॉक केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 13:46 IST

ईशा आणि समर्थ हे 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहरे आहेत. पण, बिग बॉसच्या घरातील त्यांच्या कृत्यामुळे त्यांचे चाहते नाराज असून त्यांना ट्रोल केलं जात आहे. 

'बिग बॉस १७' सुरू झाल्यापासून टीव्ही अभिनेत्री ईशा मालवीय चर्चेत आली आहे. ईशाने एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमारसह 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली होती. त्यानंतर ईशाचा बॉयफ्रेंड समर्थची बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्याने सगळेच आश्चर्यचकित होते. समर्थची घरात एन्ट्री झाल्यापासूनच ईशाचे आणि त्याचे 'बिग बॉस'च्या घरातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. समर्थ आणि ईशा अनेकदा 'बिग बॉस'च्या घरात रोमँटिक होताना दिसून आले. 

समर्थ आणि ईशाचा बेडरुममधील एक व्हिडिओही समोर आला होता. या व्हिडिओत समर्थ ईशाला किस करताना दिसत होता. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली होती. त्यानंतरही ते रोमँटिक झालेले दिसून आले होते. आता पुन्हा एकदा समर्थ आणि ईशा 'बिग बॉस'च्या घरात जवळ आले आहेत. 'बिग बॉस'च्या घरातील त्यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. 'बिग बॉस'च्या घरातील लाइट्स बंद होताच समर्थने ईशाला जवळ ओढत घरातील इतर सदस्यांसमोरच किस केलं. त्यांचा लिपलॉकचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

'बिग बॉस'च्या घरातील ईशा आणि समर्थचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना पुन्हा एकदा ट्रोल केलं आहे. ईशा आणि समर्थ हे 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहरे आहेत. पण, बिग बॉसच्या घरातील त्यांच्या कृत्यामुळे त्यांचे चाहते नाराज असून त्यांना ट्रोल केलं जात आहे.  

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार