Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'च्या घरात सुशांतचं नाव घेण्यावरुन अंकिताला आईने सुनावलं, म्हणाल्या, "सासरच्या लोकांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 16:26 IST

वारंवार सुशांतचं नाव घेणाऱ्या अंकिताला नेटकऱ्यांनीही ट्रोल केलं होतं. आता अंकिताच्या आईनेही सुशांतचं नाव घेण्यावरुन तिची अप्रत्यक्षरित्या कानउघाडणी केली आहे. 

'बिग बॉस १७' मध्ये सहभागी झालेली अंकिता लोखंडे पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. अंकिता आणि तिचा पती विकी जैनमध्ये छोट्या छोट्या कारणांवरुन वाद होताना दिसतात. नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात सदस्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. अंकिता आणि विकीची आईही 'बिग बॉस'मध्ये आल्या होत्या. विकीच्या आईने अंकिताला सुनावलं होतं. विकीबरोबरच्या वागण्यावरुनही त्यांनी अंकिताकडे नाराजी व्यक्त केली होती. विकीच्या आईनंतर आता अंकिताच्या आईनेही अभिनेत्रीचे कान टोचले आहेत. 

अंकिता 'बिग बॉस'च्या घरात अनेकदा एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसली. सुशांतबरोबरच्या नात्याबाबतही अंकिताने अनेक खुलासे केले होते. वारंवार सुशांतचं नाव घेणाऱ्या अंकिताला नेटकऱ्यांनीही ट्रोल केलं होतं. त्यानंतर विकीच्या आईनेही "अंकिता सहानुभुतीसाठी सुशांतचं नाव घेते", असं धक्कादायक विधान केलं होतं. आता अंकिताच्या आईनेही सुशांतचं नाव घेण्यावरुन तिची अप्रत्यक्षरित्या कानउघाडणी केली आहे. 

अंकिताच्या आईने अभिनेत्रीला भूतकाळाबद्दल न बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या, "तुला या बाबतीत जास्त बोललं नाही पाहिजे. तू त्याच्याबद्दल खूप गोष्टी बोलत आहेस." त्यावर अंकिता तिच्या आईला विचारते, "मी नेहमी त्याच्याबद्दलच बोलताना दिसत आहे का? मुन्नवर आणि अभिषेकला सुशांत खूप आवडतो. त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलते. मी विकीसमोरही त्याच्याबद्दल बोलते." त्यानंतर अंकिताची आई तिला समजावते. "तू त्याच्याबद्दल बोलतेस हे विकीच्या घरच्यांना आवडत नाही. विकी समंजस आहे. पण., त्याच्या घरातील लोकांना या गोष्टी आवडत नाहीत," असं त्या म्हणतात.  

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत