Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिताने विकीला मारली लाथ; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचं पतीबरोबर जोरदार भांडण, म्हणाली, "तू माझा वापर केलास"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 09:13 IST

Bigg Boss 17 : अंकिता आणि विकीमध्ये जोरदार भांडण झालं आहे. 'बिग बॉस'च्या घरातील त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

'बिग बॉस १७' च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने  पती विकी जैनसह 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली होती. परंतु, त्यानंतर त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. पण, काही काळानंतर हे नवरा बायको सगळं विसरून एकमेकांवर प्रेम करताना दिसायचे. आता पुन्हा अंकिता आणि विकीमध्ये जोरदार भांडण झालं आहे. 'बिग बॉस'च्या घरातील त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

'द खबरी' या ट्वीटर अकाऊंटवरुन अंकिता आणि विकीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ते दोघेही भांडताना दिसत आहेत. अंकिता विकीवर रागवल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या भांडणामध्ये अंकिताने विकीला लाथ मारल्याचंही व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. "तू स्वार्थी आणि मुर्ख आहेस. तुझ्याबरोबर राहून माझं डोकं फिरलं आहे. आपलं लग्न झालंय हे विसरून जा. आजपासून तू आणि मी वेगळे आहोत. तू पहिल्यापासून असाच होतास. तू माझा वापर केला आहेस," असं अंकिता विकीला म्हणते. या व्हिडिओमुळे अंकिता-विकीच्या नात्यात फूट पडली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

पहिल्या दिवसापासूनच विकीने 'बिग बॉस'च्या घरात त्याचा खेळ खेळायला सुरुवात केली होती. 'बिग बॉस'च्या घरातील इतर सदस्यांबरोबर तो मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करताना दिसला. विकी या घरात टिकून राहण्यासाठी छक्के पंजे करत असल्याचंही शोमध्ये पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, 'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने चित्रपटांतही काम केलं आहे. २०२१मध्ये तिने विकी जैनशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. विकी एक उद्योगपती असून त्याचा कोळशाचा फॅमिली व्यवसाय आहे. 

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडे