Join us

MC Stan च्या सिंपल दिसणाऱ्या शूजची किंमत ८० हजार', फॅन्स म्हणाले, “यात असं काय?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 20:59 IST

अलीकडेच एमसी स्टॅनने 'बिग बॉस'च्या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती. यादरम्यान ८० हजार रुपयांचे शूज फ्लॉंट केल्याबद्दल त्याला चांगलेच ट्रोल केले जात आहे. पाहा Video

'बिग बॉस १६’ चा विजेता बनल्यानंतर एमसी स्टॅन खूप चर्चेत आहे. त्यानं या शोची ट्रॉफी प्रचंड मतांनी जिंकून सर्वांना चकित केलं. 'बिग बॉस'नंतर तो फराह खानच्या पार्टीत दिसला होता, त्यानंतर तो गायब होता. तो त्याच्या मित्रांसोबत पार्टीतही दिसला नाही. मात्र, 'बिग बॉस'च्या सक्सेस पार्टीत पोहोचल्यानंतर त्यांनी जोरदार धमाल केली होती.

एमसी स्टॅन ब्लॅक आउटफिटसह लेदर जॅकेटमध्ये दिसला. त्याने स्टायलिश चष्मा घातला होता, तसेच त्याचे महागडे दागिनेही कॅरी केले होते. लाल-पांढऱ्या स्निकर्सनं त्यानं आपला लूक स्टाईल केला. पापाराझीसाठी पोज देताना एमसी स्टॅन शूज फिक्स करताना दिसला. यादरम्यान सर्वांनी त्याच्या शूजच्या किमतीवर कमेंट करायला सुरुवात केली आणि ते ८० हजारांचे असल्याचे सांगायला सुरुवात केली. मग सगळ्यांनी त्याला शूजची किंमतही विचारली आणि त्यानंतर स्टॅननं त्यांची किंमत ८० हजार असल्याचं म्हटलं.

लोकांनी केलं ट्रोलअनेकांना एमसी स्टॅनची स्टाईल आवडते, तर काहीजण त्याला ट्रोल करण्यापासून मागे हटत नाहीत. या व्हिडीओनंतर इंस्टाग्रामवर लोक स्टॅनला प्रचंड ट्रोल करत आहेत. एका युजरने तर तो मुलांचा उर्फी जावेद असल्याचंही म्हटलं आहे. काहींनी सांगितलं की त्याचे ८० हजार किमतीचे बूट २००० किंवा ५०० रुपयांना मिळतील.

तरुणांमध्ये लोकप्रियलोकप्रियतेच्या बाबतीत त्याने बड्या बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकलं आहे. ऑरमॅक्सने पॉप्युलॅरिटी लिस्ट म्हणजे लोकप्रिय व्यक्तींची यादी जारी केली आहे. जानेवारी २०२३ च्या Most Popular Non-Fiction Personalities यादीमध्ये एमसी स्टॅनने भाईजान सलमान खान याला मागे टाकलं आहे.  बिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅन इन्स्टावर लाईव्ह केलं होतं त्याच्या या इन्स्टा लाईव्हनेही इतिहास रचला. अवघ्या १० मिनिटांत एमसी स्टॅनचे लाइव्ह व्ह्यू पाच लाखांवर पोहोचले. तो लाइव्ह असताना ५ लाख ४१ हजार लोक त्याला पाहत होते. इतके जास्त व्ह्यूज असणारा एमसी स्टॅन हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे. याबाबतीत एमसी स्टॅनने शाहरुख खानला मागे टाकलं. आहे. शाहरुख खानच्या इन्स्टा लाईव्हवर २५५ के व्ह्यूज आले आहेत.