Join us

Bigg Boss 16, Archana Audition Clip: अर्चना गौतम ९ वर्षांत इतकी बदलली, जुना ऑडिशन व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:38 IST

Bigg Boss 16, Archana Audition Clip: होय, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नऊ वर्षांआधी अर्चना कशी दिसायची, हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.

बिग बॉसचा १६ वा सीझन (Bigg Boss 16) अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोण बाजी मारणार, कोण जिंकणार हे जाणून घेण्यास सगळेच उत्सुक आहेत. तूर्तास चार स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत पोहोचले आहेत. अर्चना गौतम, प्रियांका चहर चौधरी, शालीन भनोट आणि निमृत कौर आहलुवालिया यांना तिकिट टू फिनाले मिळालं आहे. एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि सुम्बुल नॉमिनेट आहेत. याचदरम्यान अर्चना गौतमचा (Archana Gautam) एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. होय, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नऊ वर्षांआधी अर्चना कशी दिसायची, हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.

व्हिडीओ एका शोच्या ऑडिशनचा आहे. यात अर्चना एका शोसाठी ऑडिशन देताना दिसत आहे. बाजीगर या शोमध्ये अर्चना गौतम स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. भोजपुरी स्टार रवी किशन, पंकज भदौरिया व अन्य स्टार्स शोचे जज आहेत. अर्चना या शोमध्येही गोड गोड बोलून जजेसला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतेय. मी फक्त तुम्हाला भेटायला या शोमध्ये आले, असं अर्चना रवी किशन यांना म्हणते. सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ही बिग बॉसमधली अर्चना आहे, यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये.

उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये राहणाऱ्या अर्चनाचा जन्म 1 सप्टेंबर 1995 रोजी झाला. अर्चनाचे वडील राजकारण सक्रिय असल्याचं म्हटलं जातं. तिची आई गृहिणी आहे. अर्चनाने टीव्ही आणि प्रिंटच्या जाहिरातीतून करिअरची सुरुवात केली. तिने ग्रेट ग्रँड मस्ती आणि हसीना पारकार यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत.

2018 मध्ये तिने ‘मिस बिकिनी इंडिया’ या स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हापासून तिला बिकिनी गर्ल म्हणून ओळखलं जातं. आपल्या वडिलांप्रमाणेच अर्चनालाही राजकारणात नाव कमवायचं आहे. काँग्रेसच्या तिकिटावर तिने निवडणूकही लढली आहे. सध्या ती बिग बॉस 16 मध्ये कमाल दाखवत आहे. बिग बॉसच्या घरात अर्चना सगळ्यांना पुरून उरली आणि आता ती फायनलमध्ये पोहोचलीये.

 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार