Join us

Bigg Boss 15: राखीच्या विचित्र वागण्याला पती रितेशही कंटाळला; सगळ्यांसमोर केला अपमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 18:21 IST

Rakhi sawant : बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासून राखी तिच्या विचित्र स्वभावामुळे चर्चेत येत आहे. मोठमोठया आवाजात बोलणं, वायफळ बडबड करणं, अन्य स्पर्धकांसोबत वाद घालणं यामुळे तिची चर्चा होत आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा शो म्हणजे बिग बॉस (Bigg boss).  यंदा या शोचं १५ वं पर्व सुरु असून हे पर्व विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. सुरुवातीच्या काळात प्रेम प्रकरणं, स्पर्धकांमधील वादविवाद यामुळे या पर्वाची चर्चा होती. परंतु, आता हे पर्व अभिनेत्री राखी सावंतमुळे गाजत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंतनेबिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. विशेष म्हणजे तिच्यासोबत तिचा पती रितेशनेही या शोमध्ये सहभाग घेतला आहे. या शोच्या निमित्ताने पहिल्यांदाच तो प्रसारमाध्यमांसमोर आला. परंतु, या घरात आल्यानंतर राखी आणि रितेशमध्येच वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासून राखी तिच्या विचित्र स्वभावामुळे चर्चेत येत आहे. मोठमोठया आवाजात बोलणं, वायफळ बडबड करणं, अन्य स्पर्धकांसोबत वाद घालणं यामुळे तिची चर्चा होत आहे. इतकंच नाही तर तिचं हे वागणं आता घरातील स्पर्धकांना खटकू लागलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या वागण्याला आता पती रितेशही कंटाळा आहे. अलिकडेच झालेल्या भागात राखीच्या वागण्याला कंटाळून त्याने तिला फटकारल्याचं पाहायला मिळालं.

रितेशने घरातील अन्य स्पर्धकांसोबत बोलणं किंवा चर्चा करणं राखीला फारसं आवडत नसल्याचं दिसून येत आहे. अनेकदा रितेश घरातील सदस्यांसोबत बोलत असताना राखीने त्याला अडवल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. मात्र, यावेळी रितेशने राखीला फटकारलं आहे.  मी काही लहान मुलगा नाही, असं म्हणत रितेशने सगळ्यांसमोर राखीला खडसावून सांगतो. ज्यामुळे या पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर रितेशच्या नावाची चर्चा होती. राखीने रितेशसोबत लग्न केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, रितेश वारंवार प्रसारमाध्यमांसमोर येण्याचं टाळत होता. त्यामुळे त्याच्याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अखेर बिग बॉसच्या माध्यमातून तो सर्वांसक्षम आला आहे. 

टॅग्स :राखी सावंतसेलिब्रिटीबिग बॉस