‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15 ) प्रेक्षकांना काल जोरदार धक्का बसला. मायशा अय्यर (Miesha Iyer) घरातून बाहेर झाली. सलमान खाने मायशा अय्यर शोमधून बाद होण्याची घोषणा केली आणि घरातील अख्ख वातावरण बदललं. मायशावर जीव ओवाळून टाकणारा ईशान सहगल (ieshaan sehgaal) ढसाढसा रडला. मायशाच्या एलिमिनेशनची घोषणा झाली आणि ईशानने तिला घट्ट कवटाळत किस केलं आणि जोरजोरात रडू लागला. उर्वरित सदस्य ईशानला समजवताना दिसले. हा एपिसोड इथेच संपला नाही...! होय, मायशाच्या एलिमिनेशननंतर आज रविवारी ‘बिग बॉस 15’च्या आणखी एक जोरदार धक्का बसणार आहे. आजही बिग बॉसच्या घरातून आणखी एक सदस्य बाद होणार आहे.‘बिग बॉस 15’बद्दल खडान् खडा माहिती देणा-या ‘द खबरी’ने दिलेल्या वृत्तानुसार, आज ‘बिग बॉस 15’च्या घरातून एक शॉकिंग एलिमिनेशन होणार आहे. घराबाहेर जाणारा हा सदस्य अन्य कुणी नसून ईशान सहगल आहे. ‘द खबरी’ने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.मायशा पाठोपाठ ईशानची एक्झिट चाहत्यांसाठी मोठा धक्का असणार आहे.
‘Bigg Boss 15’च्या चाहत्यांना ‘जोर का झटका’? मायशा अय्यरनंतर ‘हा’ सदस्यही झाला बाद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 16:09 IST