Join us
Daily Top 2Weekly Top 5

फिनालेपूर्वीच अभिनव शुल्का झाला OUT, सोशल मीडियावर शो विरोधात चाहत्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 17:56 IST

फिनालेच्या तीन आठवड्यांपूर्वीच गुगलने बिग बॉसच्या विजेत्याचे नाव जाहीर करत सा-यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. फिनाले पार पडण्यापूर्वीच विजेत्याचे नाव समोर आल्याने गोंधळच उडाला होता.

छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस-14' हा रियालिटी शो सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वाद, शोमधील अश्लीलता यामुळे बिग बॉसची चर्चा जोरात रंगते आहे. बिग बॉसचं विजेतेपद पटकावण्यासाठी प्रत्येकजण खटाटोप करत असतो. स्पर्धकांच्या हातात आता फक्त एकच आठवडा उरला आहे. त्यानंतर फिनालेमध्ये विजेता कोण बनतो हे पाहणेही रंजक असणार आहे. अभिनव शुल्काची खेळी सुरुवातीपासूनच इतकी खास नव्हती.मात्र राखी सावंतमुळे तोही शोमध्ये दिसू लागला होता. 

 

शोच्या सुरुवातीला अभिनव शुक्लाला रुबीनाच्या आडून खेळतो असं म्हणत खूप ट्रोल केलं गेलं होतं. पण हळूहळू त्यानं आपला खेळ दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली आणि बिग बॉस हाऊसमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 

 ऐन खेळ रंगात येत असताना अचानक एलिमिनेशन प्रक्रिया करण्यात आली आणि यातत अभिनव शुल्का घराबाहेर पडणा आहे. अभिनव शुल्काची पत्नी रुबीना दिलैक आता फिनालेपर्यंत पोहचली असून पती अभिनव शुल्का शोमध्ये  रुबीनासोबत नसल्यामुळे ती खूपच निराश झाल्याचे पाहायला मिलाले. तुर्तास अभिनवच्या चाहत्यांनी मात्र शोविरोधातच टीका करायला सुरुवात केली आहे.अभिनवची खेळी चांगली सुरु असतानाच त्याला शो बाहेर काढणे त्याच्या चाहत्यांना चांगलेच खटकले आहे. 

फिनालेच्या तीन आठवड्यांपूर्वीच गुगलने बिग बॉसच्या विजेत्याचे नाव जाहीर करत सा-यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. फिनाले पार पडण्यापूर्वीच विजेत्याचे नाव समोर आल्याने गोंधळच उडाला होता. 'बिग बॉस 14' चा विजेता कोण हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्साहीत आहेत. चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार हे शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला त्यावेळी गुगलवर रुबीना दिलैकचे नाव समोर आल्याचे दिसले.

सुरुवातीपासून घरात स्ट्राँग कंटेस्टंट म्हणून रुबीनाच असल्याचे घरातल्या स्पर्धकांनाही वाटते. त्यामुळे नेमकमा विजेता कोण ठरणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :बिग बॉस १४