Join us

 ‘बिग बॉस’च्या घरात मोबाईलची खणखण? इंटरेस्टिंग असणार 14 वे सीझन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 14:51 IST

 ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन कधी नव्हे इतके गाजले होते. आता ‘बिग बॉस 14’ची तयारी सुरु झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ‘बिग बॉस 14’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ते सुद्धा नव्या ढंगात, नव्या रूपात.

ठळक मुद्देबिग बॉसच्या घरात यावेळी लोकप्रिय चेहरे दिसू शकतात.

 ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन कधी नव्हे इतके गाजले होते. आता ‘बिग बॉस 14’ची तयारी सुरु झाली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात  ‘बिग बॉस 14’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ते सुद्धा नव्या ढंगात, नव्या रूपात. होय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत आणि सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे.‘बिग बॉस 14’ नवा फॉर्मेट लॉकडाऊनशी संबंधित असेल, असे कळतेय. लॉकडाऊनसोबत सोशल डिस्टेंसिंगचाही प्रभाव ‘बिग बॉस 14’मध्ये पाहायला मिळणार आहे. या सीझनची टॅगलाईनही खास असणार आहे. ती म्हणजे, बिग बॉस 14 लॉकडाऊन एडिशन.

तुम्हाला माहित आहेच की, बिग बॉसच्या घरातील व्यक्तिला बाहेरच्या व्यक्तिशी बोलण्याची परवानगी नसते. पण या सीझनमध्ये काही वेगळेच पाहायला मिळू शकते. होय, या सीझनमध्ये स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात फोन वापरण्याची संधी मिळणार असल्याचे कळतेय.बिग बॉसच्या स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात मोबाइन फोन नेण्यास परवानगी देण्यात येणार  आहे. जेणेकरुन त्यांना बाहेर असलेल्या लोकांच्या संपर्कात राहता येईल. तसेच स्पर्धकांना इलेक्ट्रोनिक गॅजेट देखील देण्यात येणार आहे. त्याद्वारे त्यांना व्हिडीओ मेसेज आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाठवता येणार असल्याचे कळतेय. अर्थात अद्याप याबद्दल अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. पण लवकरच याबद्दलची घोषणा होईल, असे कळतेय. ‘बिग बॉस 14’साठीच्या स्पर्धकांची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व स्पर्धकांना कोरोना चाचणी करूनच घरात पाठवण्यात येणार आहे.

 या नावांची आहे चर्चाबिग बॉसच्या घरात यावेळी लोकप्रिय चेहरे दिसू शकतात. चर्चा खरी मानाल तर टीव्हीवरची बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री निया शर्माला बिग बॉसची ऑफर मिळाली आहे. याशिवाय अभिनेता विवियन डिसुजा, शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन, सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन यांनाही बिग बॉसची ऑफर मिळाल्याचे समजतेय.

टॅग्स :बिग बॉससलमान खान