Join us
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही चुकीच्या व्यक्तिला विजेता बनवले...! रूबीनाचा अ‍ॅटिट्यूड पाहून चाहत्यांना ‘पश्चाताप’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 15:15 IST

होय, या व्हिडीओतील रूबीनाचा अ‍ॅटिट्यूड पाहून चाहतेही हैराण झालेत.

ठळक मुद्दे‘बिग बॉस 14’मध्ये रुबीना दिलैकने पती अभिनव शुक्लासोबत एन्ट्री घेतली होती. रूबीना व अभिनव यांचा घटस्फोट होणार  होता.  याचदरम्यान या जोडप्याला बिग बॉस 14 ची आॅफर आली.

‘बिग बॉस 14’ची विजेती रूबीना दिलैकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय. या व्हिडीओनंतर रूबीना तेवढीच ट्रोलही होतेय. होय, या व्हिडीओतील रूबीनाचा अ‍ॅटिट्यूड पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. नुसते हैराण नाहीत तर काहींना तर उगाच रूबीनाला बिग बॉस 14 ची विजेती बनवले, असा ‘पश्चाताप’ चाहत्यांना होऊ लागलाय.‘बिग बॉस 14’ जिंकल्यानंतर रूबीना पहिल्यांदाच एअरपोर्टवर दिसली. रूबीनाला पाहून फोटोग्राफर्सचे कॅमेरे पुढे सरसावलेत. काही पत्रकारांनी रूबीनाला ‘बिग बॉस 14’शी संबंधित काही प्रश्न विचारले. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत, रूबीना आपल्याच तो-यात पुढे निघाली.  रूबीनाने फक्त हात उंचावून बाय केले.

रूबीनाचा हा अंदाज, हा अ‍ॅटिट्यूड चाहत्यांना आवडला नाही तर त्यांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. बिग बॉस जिंकल्यानंतर रूबीना रूबाब दाखवू लागलीये. अधिक गर्विष्ठ झाली आहे, असे चाहत्यांना वाटतेय.अनेक चाहत्यांनी रूबीनाला ट्रोल केले. ‘बिग बॉस जिंकल्यानंतर कोणी इतके कसे बदलू शकते?,’ असा सवाल एका युजरने लिहिला. शो जिंकल्यानंतर रूबीनाच्या डोक्यात हवा गेलीय. आम्ही चुकीच्या व्यक्तिला विजेता बनवले, असे एका युजरने लिहिले. रूबीनाला बोलायचेच नव्हते, समजू शकतो. पण कारण नक्कीच सांगू शकली असतील, अशा शब्दांत एका युजरने तिला फटकारले.

‘बिग बॉस 14’मध्ये रुबीना दिलैकने पती अभिनव शुक्लासोबत एन्ट्री घेतली होती. रूबीना व अभिनव यांचा घटस्फोट होणार  होता.  याचदरम्यान या जोडप्याला बिग बॉस 14 ची आॅफर आली. या शोच्या निमित्ताने दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवता आला. आता दोघांनी घटस्फोटाचा निर्णय मनातून काढून टाकला आहे. इतकेच नाही तर हे जोडपे लवकरच दुसºयांदा लग्न करणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस १४