Join us
Daily Top 2Weekly Top 5

'Bigg Boss 14': राधे माँसह 'हे' प्रसिद्ध कलाकार दिसणार घरात, वाचा संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 16:49 IST

लवकरच ‘बिग बॉस 14’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता ‘बिग बॉस 14’ची तयारी सुरु झाली आहे. लवकरच ‘बिग बॉस 14’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन कधी नव्हे इतके गाजले होते. आता ‘बिग बॉस 14’ची तयारी सुरु झाली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात  ‘बिग बॉस 14’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यातील स्पर्धकांच्या नावांची चर्चा सुरु आहे. काही स्पर्धकांची अजूनही  बिग बॉसच्या मेकर्सविषयी बोलणी सुरु आहे तर काहींना साईन केले गेले आहे.  

राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार बिग बॉसच्या घरात यावर्षी राधे माँ, सुंगधा मिश्रा, पर्ल वी पुरी, निशांत मल्कानी, जॅस्मिन भसीन, मानसी श्रीवास्तव, शांती प्रिया, साक्षी चोप्रा, निया शर्मा, शिरीन मिर्झा, पवित्रा पूनिया, निखिल चिनप्पा, मिशाल रहेजा, अविनाश मुखर्जी, आकांक्षा पुरी आणि व्हिव्हियन डिसेना यांचा नावाचा समावेश आहे. 

सलमान खानला दिले जाणार 250 कोटी बिग बॉस 14चे सूत्रसंचालन करण्यासाठी सलमानला 250 कोटी दिले आहेत. सलमान आठवड्यातून एकदा शोच्या दोन भागांसाठी शूटिंग करणार आहे. 12 आठवड्यांसाठी सलमानला प्रत्येक भागासाठी 10.25 कोटी रुपये दिले जाणार आहेत.  म्हणजे एका आठवड्यात दोन भागांसाठी सलमानला 20.50 कोटी रुपये मिळतील.

टॅग्स :बिग बॉससलमान खान