Join us

Bigg Boss 14: रोमँटिक झाले अली गोनी आणि जॅस्मिन, तर रूबीना व अभिनवने खुल्लमखुल्ला केली किस

By तेजल गावडे | Updated: November 7, 2020 15:28 IST

बिग बॉस १४चा विकेंडचा वॉर खूप मनोरंजक ठरणार आहे कारण यावेळी घरातील सदस्यांसोबत होस्ट सलमान खानचादेखील दमदार परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे.

बिग बॉस १४चा विकेंडचा वॉर खूप मनोरंजक ठरणार आहे कारण यावेळी घरातील सदस्यांसोबत होस्ट सलमान खानचादेखील दमदार परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे. इतकेच नाही तर शोमध्ये रेमो डिसूझादेखील आपल्या डान्सिंग टीमसोबत धमाल करताना दिसणार आहे.

विकेंडच्या वॉरमध्ये अली गोनी आणि जॅस्मिन भसीनने तेरे मेरे बीच में या गाण्यावर रोमँटिक डान्स केला तर अभिनव शुक्लानेदेखील पत्नी रुबीनासाठी बीवी नंबर वन गाण्यावर डान्स केला. कलर्स वाहिनीने रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये रेमो डिसूझा आणि त्याच्या टीमने स्टेजवर आल्यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि सलमान खानला गर्मी गाण्याची हुक स्टेपदेखील करायला लावली.

इविक्शनबद्दल सांगायचं तर या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी तीन कंटेस्टंट्स नॉमिनेट झाले आहेत. ज्यात राहुल वैद्य, शार्दुल पंडित आणि नैना सिंग यांच्या नावाचा समावेश आहे.

रुबीना दिलैकदेखील नॉमिनेटेड होती पण नवरा अभिनवने तिला इम्युनिटी देऊन तिचा बचाव केला आहे. रिपोर्ट्सनुसार, वोटिंगमध्ये आतापर्यंत नैना सिंगला सर्वात कमी मते मिळाली आहेत आणि जर कोणता सीन पलटला नाही तर नैना सिंग या आठवड्यात घरातून बेघर होऊ शकते.

तर बिग बॉस १४ला एक महिना पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी फॉरमॅटमध्ये बदल केला आहे. घरातील रेड झोन एरिया बंद करण्यात येणार आहे आणि त्याजागी काळी कोठडी किंवा जेल बनवला जाणार आहे.

टॅग्स :बिग बॉस १४जास्मीन भसीनसलमान खानरेमो डिसुझा