Join us

Bigg Boss 13 : 'बिग बॉस'च्या घरातील 'या' स्पर्धकाला नेटकऱ्यांनी म्हटलं 'डायन', वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 18:17 IST

तिसऱ्याच दिवशी बिग बॉसने घरातल्या सदस्यांना टॉर्चर करणारं टास्क दिलं होतं.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या तेराव्या सीझनला सुरूवात होऊन तीन दिवस उलटले आहेत. तिसऱ्याच दिवशी बिग बॉसने घरातल्या सदस्यांना टॉर्चर करणारं टास्क दिलं होतं. या टास्कमध्ये सिद्धार्थ शुक्ला व कोएना मित्राला घरातल्या सदस्यांनी मिळून टॉर्चर केलं. या टास्कचं नाव होतं बिग बॉस हॉस्पिटल. या टास्क दरम्यान शेफाली बग्गा हिने आरती सिंगच्या खासगी आयुष्याबद्दल बोलून तिला रडवलं. ती आरतीला सिद्धार्थ शुक्लासोबतच्या नात्याबद्दल विचारत होती. 

 शेफाली म्हणाली की, काय झाल होतं सिद्धार्थ व आरतीमध्ये? सिद्धार्थ आणि तुझ्या लव्ह स्टोरीचं काय झालं होतं? सांगून टाक जगाला जाणून घ्यायचं आहे. यासोबतच शेफाली व्हिडिओमध्ये आरतीच्या घटस्फोटाबद्दलदेखील विचारते आहे. तर शहनाज तिच्या चेहऱ्याला घेऊन कमेेंट्स करताना दिसली.

बिग बॉस हॉस्पिटल टास्कमध्ये आरती सिंग शेफालीच्या गोष्टी ऐकून रडू लागली.

या टास्कदरम्यान सिद्धार्थ शुक्लाला टॉर्चर करत घरातील सर्व मर्यादा ओलांडल्या. सिद्धार्थचे वॅक्सिंग करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर शेण, माती व बऱ्याच गोष्टी टाकल्या. सिद्धार्थची अवस्था पाहून बाकी सदस्य हैराण झाले.

 

सिद्धार्थला टॉर्चर दुसऱ्या टीम मेंबरमधील पारस छाबडाने केलं.

 

सिद्धार्थने या टास्कमधून प्रेक्षकांचे मन जिंकले. 

तर कोएना मित्राने हे टास्क पूर्ण करण्यासाठी मिरची व अंडे खाल्ले. त्यामुळे युजर्सनं कोएनाचं कौतूक केलं. या टास्कसाठी सर्वात जास्त निगेटिव्ह कमेंट शेफाली बग्गासाठी आल्या.

आरती सिंगला टास्क दरम्यान टॉर्चर केलं आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोललेल्या गोष्टी लोकांना आवडल्या नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर युजर्सनं तिला घरातून बाहेर जायला सांगितलं.

 

इतकंच नाही तर एका युजरनं या सीझनमधील डायन असं म्हटलं. 

टॅग्स :बिग बॉसरश्मी देसाई