छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चित आणि वादग्रस्त असलेल्या शो असलेल्या ‘बिग बॉस’च्या 13 व्या सीझनची सध्या सगळीकडे चर्चा आहे. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार एक कार्यक्रमाच्या ठिकाणी बिग बॉसची एक्स विजेती श्वेता तिवारी आली होती. यावेळी तिला बिग बॉस 13 संबंधीत प्रश्न विचारण्यात आले. यावर श्वेताने जे उत्तर दिले ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. श्वेता म्हणाली, ''माझ्याकडे बिग बॉस बघायला वेळ नाही. दुसरीकडे मला मुलं आहेत आणि त्यांच्यासोबत बसून मी हा शो नाही बघू शकतं. कारण रेयांशसमोर जर कुणी मोठ्या आवाजात बोलले तर तो घाबरून जातो आणि तसाही तो कार्टून बघत असतो त्यामुळे कुणालाच टीव्ही बघायला मिळत नाही. ''
या कारणामुळे सलमान खानचा शो बघत नाही ही अभिनेत्री,काही दिवसांपूर्वीच पतीवर मारहाणीचा लावला होता आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 15:00 IST