Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'च्या १३व्या सीझनचा लीक झाला प्रोमो, समोर आली स्पर्धकांची नावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 16:41 IST

Bigg Boss 13 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त शो बिग बॉसचा तेरावा सीझन लवकरच सुरू होत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त शो बिग बॉसचा तेरावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सीझन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या शोमध्ये कोण कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. त्यात आता सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला आहे की, या सीझनचा प्रोमो लीक झाला आहे. ज्यामुळे या सीझनमध्ये काही स्पर्धकांची नावं उघड झाली आहेत.

बिग बॉसचा १३ वा सीझन येत्या २९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी या शोमध्ये काहीतरी वेगळं असणार आहे अशी चर्चा सुरुवातीपासूनच आहे. पण या शोमध्ये कोणकोणते स्पर्धक असणार याबाबत सगळ्यांच्या मनात उत्सुकता कायम आहे. अशातच आता या शोचा नवा प्रोमो लीक झाल्याचं बोललं जात आहे. इन्स्टाग्रामवरील बिग बॉसच्या एका फॅनपेज वरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओप्रमाणे छोट्या पडद्यावरील संस्कारी बहू देबोलीना भट्टाचार्जी आणि सिद्धार्थ शुक्ला यांची नावं समोर येत आहेत. मात्र त्यावर आता विश्वास ठेवणं उचित ठरणार नाही. 

लीक झालेल्या या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये विकास गुप्ता आणि काम्या पंजाबी देवोलीना भट्टाचार्जीबद्दल बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये देवोलीनाचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरीही तिच्या पुसटशा दिसणाऱ्या चेहऱ्यावरुन ती देवोलीना असल्याचा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे. तर सिद्धार्थ शुक्ला खतरों के खिलाडी सीझन ७चा विजेता आहे.

यंदाच्या सीझनमध्ये चंकी पांडे, राजपाल यादव, वरीना हुसैन, टीवी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी, अंकिता लोखंडे, राकेश वशिष्ठ, माहिका शर्मा, डैनी डी, जीत, सांसद चिराग पासवान, बॉक्सर विजेंद्र सिंह, राहुल खंडेलवाल, मेघना मलिक, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती, दयानंद शेट्टी, फैजी बू, सोनल चौहान, सिद्धार्थ शुक्ला यांच्यासोबत राखी सावंत आणि दीपक कलाल यांच्या नावाची चर्चा आहे. 

टॅग्स :सलमान खानबिग बॉस