Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 13 Memes : बिग बॉसची सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली, मीम्स पाहून तुम्ही देखील खळखळून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 14:27 IST

बिग बॉस 13 ची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर देखील चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देबिग बॉसचे स्पर्धक पहिल्या आवड्यात हम साथ साथ है या चित्रपटातील सदस्यांप्रमाणे असतात तर दुसऱ्या आठवड्यापासून ते मारामारी करायला लागतात असे मीम एका नेटिझनने शेअर केले आहे.

सलमान खानचा 'बिग बॉस 13' हा प्रसिद्ध रिॲलिटी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. बिग बॉस १३ चा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या कार्यक्रमात कोण कोण स्पर्धक हजेरी लावणार याचा अंदाज लावला जात होता. या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रेक्षकांना काल पाहायला मिळाला. यामध्ये सलमानने त्याच्या अंदाजात कार्यक्रमातील स्पर्धकांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमामधील नवीन नियमांविषयी सांगितले. तसेच सलमान आणि या कार्यक्रमातील स्पर्धकांचा धमाकेदार पराफॉर्मन्स यात प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

बिग बॉस 13 ची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर देखील चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमावरील विविध मीम्स प्रेक्षकांना सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. बिग बॉस या कार्यक्रमावरून काही जणांनी सलमानसोबत सहानभूती व्यक्त केली आहे तर इतर रिॲलिटी शोमधील स्पर्धक या कार्यक्रमात दिसत असल्याने काही जण बिग बॉसची सोशल मीडियावर टर उडवताना दिसत आहेत.

 

एका नेटिझनने अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातील हात जोडतानाचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, जेव्हा सलमान महिला स्पर्धकांना आपला जोडीदार निवडायला सांगतो त्यावेळी अशी अवस्था असते सिद्धार्थ शुक्लाची...

 

बिग बॉसमध्ये स्पल्टिसव्हिला, रोडीजमध्ये स्पर्धक दिसत असल्याचे म्हणत एका नेटिझनने बिग बॉसची खिल्ली उडवली आहे.

 

बिग बॉसचे स्पर्धक पहिल्या आवड्यात हम साथ साथ है या चित्रपटातील सदस्यांप्रमाणे असतात तर दुसऱ्या आठवड्यापासून ते मारामारी करायला लागतात असे मीम एका नेटिझनने शेअर केले आहे.

 

बिग बॉस सुरू होणार हे कळल्यापासून आता रोज भांडणं पाहायला मिळणार म्हणून लोक खूश आहेत.

 

बिग बॉसच्या या सिझनमध्ये आपल्याला रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्य, सिद्धार्थ जे, शेहनाझ गिल, कोएना मित्रा, सिद्धार्थ शुक्ला यांसारखे स्पर्धक पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ शुक्ला हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे. 

टॅग्स :बिग बॉस