Join us

Bigg Boss 11 : शिल्पा शिंदे अन् आकाश ददलानीची घराबाहेर नव्हे तर येथे होणार रवानगी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 15:36 IST

बिग बॉसच्या ११व्या सीजनमध्ये आता कमालीचा ट्विस्ट येणार आहे. होय, या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या दोन सदस्यांपैकी एकही सदस्य बाहेर ...

बिग बॉसच्या ११व्या सीजनमध्ये आता कमालीचा ट्विस्ट येणार आहे. होय, या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या दोन सदस्यांपैकी एकही सदस्य बाहेर जाणार नसल्याचे बिग बॉसने संकेत दिल्यामुळे या शोमध्ये आगामी काळात चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे. काल नॉमिनेशन डे होता. त्यानुसार बिग बॉसने प्रत्येक सदस्याला घरातील एका सदस्याला सुरक्षित करण्यास सांगितले होते. याकरिता सर्वांत अगोदर शिल्पा शिंदेला कन्फेशन रूममध्ये बोलाविण्यात आले. यावेळी शिल्पाने पुनीश शर्माला सुरक्षित केले. अशा पद्धतीने सर्व सदस्यांनी एकमेकांना सुरक्षित केले. परंतु आकाश ददलानी आणि लव त्यागी यांना कोणीही सुरक्षित केले नाही. त्यामुळे या दोघांना सुरुवातीला नॉमिनेट केले गेले. मात्र याचदरम्यान कॅप्टन विकास गुप्ताला एक विशेषाधिकार देण्यात आला. त्यानुसार त्याने लव त्यागीला सुरक्षित करीत शिल्पा शिंदेला नॉमिनेट केले. त्यामुळे या आठवड्यासाठी आकाश ददलानी आणि शिल्पा शिंदे हे नॉमिनेट झाले आहेत. मात्र आता या दोघांच्या नॉमिनेशन प्रक्रियेत बिग बॉसने ट्विस्ट आणण्याचे ठरविले आहे.  वास्तविक जेव्हा आकाश आणि शिल्पा नॉमिनेट झाले, तेव्हा आकाशला आपण घराबाहेर पडणार असे निश्चित वाटत होते. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरातील माझा प्रवास संपला असल्याचे आकाशने बोलूनही दाखविले. परंतु बिग बॉसकडून देण्यात आलेल्या संकेतानुसार या आठवड्यात आकाश आणि शिल्पा या दोघांपैकी कोणीही घराबाहेर पडणार नाही. कारण जेव्हा कालचा एपिसोड संपला तेव्हा स्क्रीनवर वोटिंग लाइन बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याचाच अर्थ असा की, यावेळेस कोणीही घराबाहेर पडणार नसून, या दोघांची रवानगी सीक्रेट रूममध्ये केली जाण्याची शक्यता आहे. सध्या अर्शी खानसोबत दुश्मनी झाल्यानंतर आकाश आणि शिल्पामध्ये मैत्री फुलत आहे. अशात हे दोघे सीक्रेट रूममध्ये गेल्यास त्यांना घरातील इतरांचे अनेक किस्से बघता येतील. त्याचबरोबर सीक्रेट रूममधून बाहेर आल्यानंतर या दोघांकडून जबरदस्त तमाशा केला जाण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, आकाश ददलानी हा नॉमिनेट झाल्याने प्रचंड धास्तीत आहे.