Join us

Bigg Boss 11 : लव त्यागी झाला एलिमिनेट; चाहत्यांचा रोष, बिग बॉस शो ला म्हटले फेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:04 IST

बिग बॉसचा सीजन ११ अंतिम टप्प्यात असून, या आठवड्यात एक रंगतदार टास्क शोमध्ये बघावयास मिळाला. या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या ...

बिग बॉसचा सीजन ११ अंतिम टप्प्यात असून, या आठवड्यात एक रंगतदार टास्क शोमध्ये बघावयास मिळाला. या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या घरातील हिना खान, शिल्पा शिंदे, विकास गुप्ता आणि लव त्यागी या स्पर्धकांना मुंबईतील एका मॉलमध्ये लाइव्ह वोटिंगसाठी घराबाहेर काढण्यात आले होते. मात्र या टास्कमध्ये लव त्यागीला कमी मते मिळाल्याने त्याला शोबाहेर व्हावे लागले. गेल्या काही दिवसांपासून लवने शोमध्ये जरबदस्त मुसंडी मारली होती. त्याचा अंदाज प्रेक्षकांकडून पसंत केला जात होता. मात्र अशातही त्याला घराबाहेर पडावे लागल्याने त्याच्या चाहत्यांना जबरदस्त झटका बसला आहे. चाहत्यांनी त्यांचा सर्व राग सोशल मीडियावर काढला असून, हा शो पूर्णत: फेक असल्याचे म्हटले आहे. चाहत्यांच्या मते, अशाप्रकारची एलिमिनेशन प्रोसेस व्हायला नको. लव दिल्लीचा रहिवासी आहे. अशात मुंबईमध्ये त्याला कमी मते मिळतीलच, असाही आरोप त्याच्या चाहत्यांनी केला. त्याचबरोबर ‘अन्फॅरिडिसिशन लव’ असा ट्रेण्डही होत आहे. चाहत्यांचा लवप्रतीचा हा उत्साह बघून एक गोष्ट निश्चित समजली जात आहे, ती म्हणजे त्याची लोकप्रियता जबरदस्त आहे.  खरं तर लवच्या चाहत्यांनी रोष व्यक्त करणे स्वाभाविक आहे. कारण तीन सेलिब्रिटींमध्ये एक कॉमनर असल्याने ही फाइट एकतर्फी होईल, असे सुरुवातीपासूनच बोलले जात होते. दरम्यान, घरात आता आकाश ददलानी आणि पुनीश शर्मा हे दोन कॉमनर आहेत. आता हे दोघे कुठपर्यंत मजल मारतील हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहेत. बिग बॉसच्या सीजन १० चा विनर मनवीर गुर्जर हा कॉमनर होता. अशातही पुनीश आणि आकाशला चांगली संधी आहे. परंतु यावेळेस असे होण्याची शक्यता फारच धूसर आहे.