Join us

Bigg Boss 11 : लव त्यागीने पुन्हा मारली बाजी; प्रियांक शर्मा बिग बॉसच्या घराबाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 14:46 IST

बिग बॉसचा सीजन-११ अंतिम टप्प्यापर्यंत पोहचला असला तरी, शोमध्ये कुठल्याही प्रकारचा थ्रिल बघावयास मिळत नसल्याने प्रेक्षकांची पूर्ती निराशा होताना ...

बिग बॉसचा सीजन-११ अंतिम टप्प्यापर्यंत पोहचला असला तरी, शोमध्ये कुठल्याही प्रकारचा थ्रिल बघावयास मिळत नसल्याने प्रेक्षकांची पूर्ती निराशा होताना दिसत आहे. कारण शोच्या अखेरच्या दिवसात घरात अशी कुठलीच गोष्ट होताना दिसत नाही, जेणेकरून हा शो बघितला जावा. अगोदरच शोचे प्रबळ दावेदार घराबाहेर पडल्याने शोमध्ये जणू काही दमच उरला नसल्याचे दिसत आहे. त्यातच सुरुवातीपासूनच शिल्पा शिंदे किंवा हिना खान हा शो जिंकू शकतात अशी भविष्यवाणी केली जात असल्याने प्रेक्षकांमध्येही फारसा सस्पेन्स उरला नसल्याचे दिसून येत आहे. तसेच पुनीश शर्मा व लव त्यागीसारखे काहीही न करणारे सदस्य शोमध्ये टिकून असल्याने हा शो आणखी रटाळवाणा होताना दिसत आहे. दरम्यान, या आठवड्यात झालेल्या एविक्शनमध्ये पुन्हा एकदा चमत्कार झाल्याचे बघावयास मिळाले. होय, लव त्यागीने पुन्हा एकदा बाजी मारल्याने प्रियांक शर्माला घराबाहेर पडावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांक शर्माला लव त्यागीच्या तुलनेत कमी वोट मिळाल्याने, त्याला शोबाहेर व्हावे लागले. प्रियांक घराबाहेर पडल्याने, त्याच्यासह त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे, तर लव त्यागीने पुन्हा एकदा बिग बॉससह प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. वास्तविक प्रियांक शर्मा अन् लव त्यागी याचा घरातील प्रवास पाहता प्रियांक शोमध्ये काही ना काही मसाला टाकण्यात यशस्वी होताना दिसत होता. त्यामुळे तो शोमध्ये टिकून राहील अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु सगळे काही उलट घडल्याने, बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये काहीशी निराशा झाली आहे.   खरं तर या सीजनच्या सुरुवातीपासूनच शोमध्ये सगळे काही उलटे घडताना दिसत आहे. जे स्पर्धक शोमध्ये रंजकता निर्माण करू शकत होते, ते सर्व स्पर्धक सध्या शोबाहेर पडले आहे. अशात बिग बॉसचे पुढील भाग रटाळवाणे झाले तर आश्चर्य वाटायला नको. तसेच शिल्पा किंवा हिना या दोघींपैकी एक शोचा विजेता होणार असल्याचे सुरुवातीपासूनच बोलले जात असल्याने शोमध्ये आता कुठल्याही प्रकारचा सस्पेन्स उरला नसल्याची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे.