Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 11 फेम हिना खान हॉस्पिटलमध्ये दाखल, अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 17:47 IST

Hina Khan : अभिनेत्री हिना खानची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिनाने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री हिना खान(Hina Khan)ची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिनाने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, जी पाहून चाहते नाराज झाले आहेत. आता अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे.

कसौटी जिंदगी की फेम अभिनेत्री हिनाने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली. तिने हॉस्पिटलच्या कपड्यांमधील फोटो शेअर केले आहेत. या सेल्फीमध्ये हिना थिरकताना दिसत असून अभिनेत्रीने फोटोला कॅप्शन दिले आहे, "प्रेम पसरवा..."

अभिनेत्रीने हेल्थ अपडेट फॅन्ससोबत शेअर केलेतिने मोठ्या स्माईल इमोजीसह लिहिले, 'तुम्ही कुठेही असलात, तुम्ही कोणत्या स्थितीत आहात, तुम्हाला आरसा सापडला तर आरशात सेल्फी घ्यायला विसरू नका...'. मात्र, तिला रुग्णालयात का दाखल करावे लागले, हे अभिनेत्रीने अद्याप सांगितलेले नाही. पण ही स्टोरी पाहिल्यानंतर हिना खानचे चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

हिना खान एक दशकाहून अधिक काळ टीव्ही इंडस्ट्रीचा भाग आहे. या अभिनेत्रीने सकारात्मक ते नकारात्मक अशा सर्व प्रकारच्या भूमिकांनी तिच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे. हिनाने तिच्या ये रिश्ता क्या कहलाता है या शोमधून लोकप्रियता मिळवली आणि तेव्हापासून तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिच्या फॅशन सेन्सनेही ती लोकांना प्रभावित करते. हिना खान काही काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे.

टॅग्स :हिना खानबिग बॉस