Join us

Bigg Boss 11: घरातलं वातावरण भावुक, शिल्पा शिंदेच्या आईची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 17:50 IST

बिग बॉसच्या घरात नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. मग ते सेलिब्रिटी स्पर्धक असलेल्या सदस्यांमधील वाद असो किंवा ...

बिग बॉसच्या घरात नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. मग ते सेलिब्रिटी स्पर्धक असलेल्या सदस्यांमधील वाद असो किंवा कडाक्याचे भांडण. घरातील सदस्यांमधील तू-तू-मैं-मैं बरोबर त्यांच्यातील रोमान्स, अफेअर आणि भावनिक नातंही वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. बिग बॉसचं घर हे फुल ऑफ सरप्राईज आहे असंही म्हटलं जातं कारण इथं कधी कोण काय बोलेल किंवा कधी क्षणात नाती बदलतील याचा नेम नाही. प्रत्येक सीझनमध्ये स्पर्धकांचे कुटुंबीय बिग बॉसच्या घरात सरप्राइज भेट देतात. यावेळीसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं. बिग बॉसच्या घरात शिल्पा शिंदे हिची आई आणि पुनीशचे वडील येतात. यावेळी शिल्पाच्या आईची एंट्री फारच भावनिक होती. बिग बॉसच्या घरात येताच शिल्पाची आई प्रत्येकाशी आपुलकीने बोलत असल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक स्पर्धक सदस्यांशी ती प्रेमाने बोलली. सगळ्यांची आपुलकीने विचारपूस करत सगळेच छान खेळत असल्याचं कौतुक शिल्पाच्या आईने केलं.मात्र याचवेळी भांडणं करु नका, शिव्या देऊ नका असा वडीलकीचा सल्ला द्यायलाही ती विसरली नाही.अर्शीशी तिने साधलेला संवाद तर खूपच इमोशनल होता. शिल्पाला आईसारखं मानतेस हे पाहून चांगलं वाटल्याचे शिल्पाच्या आईने सांगितलं. आई बोलली आहेस तर ते नातंही सांभाळण्याचा सल्लाही यावेळी तिने अर्शीला दिला. आपल्या लेकीला कुणीतरी आईचं स्थान दिलं हे पाहून छान वाटल्याचे तिने सांगितले. तू मानलेल्या आईची मी आई आहे असं तिने अर्शीला सांगितले. याचवेळी शिल्पाच्या आईने सगळ्यांची माफीसुद्धा मागितली. काही बोलण्यातचूक झाली असल्यास माफ करा असे तिने जाता जाता म्हटलं.Also Read: आकाश ददलानीने शिल्पा शिंदेला बळजबरीने केले किस;प्रेक्षकांनी म्हटले, ‘घरातील महिला असुरक्षित’!आकाश ददलानी बिग बॉसच्या घरातील असा सदस्य आहे,जो नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो.अर्थात त्याच्या या अतिउत्साहीपणाकडे घरातील अन्य सदस्य फारशे गांभीर्याने बघत नाही.मात्र यावेळेस त्याने जे कृत्य केले,त्यामुळे घरातील इतर सदस्यांनाच धक्का बसला नाही तर प्रेक्षकही चकित झाले.होय, त्याने शिल्पा शिंदेसोबत हे कृत्य केले. त्याने शिल्पाला बळजबरीने किस केल्याने शिल्पा चांगलीच संतापली.त्याचबरोबर शिल्पाचे चाहतेही आकाशच्या या कृत्यामुळे संतापले असून,घरात महिला सुरक्षित नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे.