Join us

Bigg Boss 11:घरात लाईट बंद झाल्यानंतर स्पर्धक करतात या गोष्टी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 15:10 IST

लवकरच बिग बॉस शो आता वेगळे वळण घेणार असंच दिसतंय. बिग बॉसमध्ये वादविवाद,घरात रंगणारा रोमान्स या सगळ्या गोष्टी काही ...

लवकरच बिग बॉस शो आता वेगळे वळण घेणार असंच दिसतंय. बिग बॉसमध्ये वादविवाद,घरात रंगणारा रोमान्स या सगळ्या गोष्टी काही नवीन नाहीत.त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये अशाचप्रकारचा मिर्चमसाला बिग बॉस 11 व्या सिझनमध्येही पाहायला मिळत आहे.बिग बॉसच्या या सिझनच्या पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांचे खटके उडायला सुरूवात झाली.तर खूप कमी दिवसाच्या मैत्रीतही प्रेमाचे अंकुर फुलताना पाहायला मिळाले.सध्या बिग बॉसच्या घरात असेच एक लव्हबर्ड आहेत.जे एकमेकांच्या प्रेमात आकंत बुडाल्याचे पाहायला मिळाले.कॅमे-याचीही भीती न बाळगता हे कपल खुलेआम किसींग करताना दिसतात.आता हे स्पर्धक कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असणार तर ते स्पर्धक दुसरे तिसरे कोणीही नसून ते आहेत पुनिष शर्मा आणि बंदगी.हे दोघे रात्री पण एकत्रच झोपतात.त्यामुळे आता दिवसेंदिवस या दोघांमध्ये नेमकं चाललंय तरी काय अशा चर्चाही घरात रंगतात.ब-याचदा पुनीष बंदगीला किससाठी फोर्स करत असतो.या दोघांची लव्हस्टोरी बघता अरमान कोहली आणि तनीषा मुखर्जी यांच्या प्रेमकहानीचीही आठवण झाल्याशिवाय राहात नाही.कारण या दोघांचीही बिग बॉसच्या घरात असतानाच जवळीक वाढली होती.दोघांचेही अफेअर बिग बॉसच्या घरातच सुरू झाले होते. इतकेच नाही तर अरमान आणि तनीषा या दोघांचेही इंटिमेट सीन्स टेलिकास्ट करण्यात आले होते.दोघांच्या अशा नात्यामुळे टीआरपी मिळेल असे कदाचित शोच्या टीमला वाटले असावे.मात्र अशा इंटिमेट सीन्सचा भरणा असलेल्या बिग बॉसचा तो भाग टीआरपी रेसमध्येही एंट्री मिळवू शकला नव्हता.कौटुंबिक शोच्या नावाखाली दाखवला जाणारा हा मिर्च मसाला विकण्याचा प्रकार बिग बॉसच्या 11 भागातही कायम असल्याचे पाहायला मिळतंय.आतापर्यंत गलिच्छ आणि गैरवर्तण असलेल्या या शोवर बंदीही आणण्याचा प्रयत्न झाला.मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही.या उलट हा शो सिझन वर सिझन आणत मनोरंजनाच्या नावाखाली रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो.अगदी तोच फंडा याशोमध्येही वापरण्यात येत असून यंदाच्या सिझनमध्ये पुनिष आणि बंदगी यांचे नाते कुठपर्यंत पोहचते हे वेळ आल्यावरच कळेल.यांत विशेष म्हणजे गेल्याच भागात अस्वच्छतेवर धडे देणारा सलमान आता या गोष्टीवर काय बोलणार या कडेच सा-यांचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळतंय.