Bigg Boss 11 : या अभिनेत्रीने म्हटले, ‘हिना खान बिग बॉसच्या घरात राहण्यास लायक नाही’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 16:13 IST
बिग बॉसची ११ ची स्पर्धक हिना खान तिच्या स्टेटमेंटवरून सगळ्यांच्याच निशाण्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच करण पटेल आणि रवी दुबे ...
Bigg Boss 11 : या अभिनेत्रीने म्हटले, ‘हिना खान बिग बॉसच्या घरात राहण्यास लायक नाही’!
बिग बॉसची ११ ची स्पर्धक हिना खान तिच्या स्टेटमेंटवरून सगळ्यांच्याच निशाण्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच करण पटेल आणि रवी दुबे हिना खानविरोधात बोलताना बघावयास मिळाले होते. आता हिना खानवर आणखी एका अभिनेत्रीने हल्लाबोल केला आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून, बिग बॉस सीजन ९ ची पूर्व स्पर्धक किश्वर मर्चेंट आहे. किश्वरने काही दिवसांपूर्वीच टेलीचक्करला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, हिना खान या शोमध्ये राहण्याच्या लायक नाही. किश्वरने स्पष्ट शब्दात म्हटले की, मी हिनाच्या विरोधात नाही. तसेच मी तिचा तिरस्कारही करीत नाही. मात्र हिना ज्यापद्धतीने या शोमध्ये अन्य टीव्ही कलाकारांबद्दल बोलत आहे, ते संतापजनक आहे. किश्वर सध्या सब टीव्हीच्या शो पार्टनर्समध्ये बघावयास मिळत आहे. जेव्हा किश्वरला हिनाविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, मला समजत नाही की, मी हिनाबद्दल काय बोलायला हवे. प्रत्येक कलाकार तिच्याविषयी बोलत आहे. ती या शोमध्ये आल्याने चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. जेव्हा ती शोच्या बाहेर येईल तेव्हा तिला समजेल की, तिची लोकप्रियता किती वाढली. मात्र अशातही मला असे वाटते की, हिना खान शोमध्ये राहण्यास डिझर्व्ह करीत नाही. कारण ती या शोमध्ये हे विसरली की, ती बिग बॉसच्या घरात राहात आहे. ती सातत्याने घरातील कॅमेºयांसमोर छोट्या पडद्यांवरील कलाकारांबद्दल उलटसुलट वक्तव्य करीत आहे. पुढे बोलताना किश्वरने म्हटले की, मी अखेरीस तिला रित्विक धंजानी आणि करण वाही यांच्याविषयी बोलताना बघितले होते. तिचे हे शब्द ऐकून मला हसू आले होते. यावेळी ईश्वरने हेदेखील सांगितले की, विकास गुप्ता माझा चांगला मित्र आहे, त्यामुळे मी त्यालाच पाठिंबा देत आहे. त्याचबरोबर मला शिल्पा शिंदेचा अंदाजही आवडत आहे. या शोच्या सुरुवातीलाच हिना खानने किश्वर मर्चेंटविषयी उलटसुलट वक्तव्य केले होते. तेव्हापासूनच किश्वर हिनाच्या विरोधात बोलत आहे. त्यावेळी तर तिने सोशल मीडियावर हिनाविषयी संताप व्यक्त केला होता.