Bigg Boss 11 : १७ आॅक्टोबरला बिग बॉसच्या घरात झाले युद्ध !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 15:14 IST
- रेश्मा पाटील मंगळवार, १७ आॅक्टोबरचा दिवस बिग बॉसच्या घरात जणू युद्धाचाच दिवस होता. नॉमिनेशननंतर पुनिश, आकाश आणि लव ...
Bigg Boss 11 : १७ आॅक्टोबरला बिग बॉसच्या घरात झाले युद्ध !
- रेश्मा पाटील मंगळवार, १७ आॅक्टोबरचा दिवस बिग बॉसच्या घरात जणू युद्धाचाच दिवस होता. नॉमिनेशननंतर पुनिश, आकाश आणि लव हे तर पिसाळल्यासारखे करु लागले, मात्र यांपेक्षा आकाश जरा जास्तच वेडा झाल्यासारखा वागू लागला होता. शर्ट काढून ओरडू लागला, आणि विकासला तर कामचोर म्हणून त्याच्यावर ताशेरे ओढत होता. तो असा वागत होता जणू तो खरच वेडा झाला आहे आणि आता त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावी लागते की काय असे वाटत होते. हे सर्व पाहून बेन म्हणते की, ‘मुली महिन्यातून एकदा वेड्या होतात, मात्र आकाश दर आठवड्याला एकदा वेडा होतो.’ त्यानंतर बिग बॉस सर्व कंटेस्टंटना रेजिस्टंट टास्क देतो. या टास्कमध्ये सर्वांना दोन टीममध्ये डिव्हाइड केले जाते आणि या टास्क नुसार एका टीमने दुसऱ्या टीमवर हल्ला करायचा आहे आणि तो हल्ला, प्रहार दुसऱ्या टीमने सहनही करायचा आहे. पहिल्या टीममध्ये स्वत: विकाससह बेन, सपना, हिना, मेहजबीन आणि हितेन यांचा समावेश आहे तर दुसऱ्या टीममध्ये पुनिश आणि इतर उर्वरित कंटेस्टंट असतात. सुरुवातीला विकासच्या टीमवर हल्ला सहन करण्याची वेळ येते. त्यानुसार विकासच्या टीममधले कंटेस्टंटना एका स्टॅँडवर हनुवटी ठेवायची आहे, आणि ती न हलवता त्यांच्यावर पुनिशची टीम जो काही हल्ला करेल ते सर्वकाही सहन करायचे आहे. असा आहे हा रेजिस्टंट टास्क. या टास्कची सुरुवात विकासपासून होते. आकाश, पुनिश आणि लव विकासवर हल्ला करतात. त्यात विकासच्या तोंडावर भुसा, माती, अंडे, मिरची पावडर आदी फेकतात. यात विकासच्या डोळ्यात भुसा जातो आणि जोरात किंचाळतो आणि पुनिशवर अटॅक करतो. यावरुन पुनिशही ओरडतो आणि विकासला म्हणतो की, तु गेममधून आऊट झाला आहे. विकास रडत रडत वॉशरुममध्ये जातो आणि त्याला मेडिकल सुविधा दिल्या जातात. त्यानंतर वेळ येते मेहजबीनची. आकाश तिच्या डोक्यावर थंड बर्फाचे पाणी टाकतो. मात्र यामुळे तिला खूप थंडी वाजायला लागते, थरथरते आणि मागे हटते. त्यानंतर सपना, हितेन आणि हिना यांच्यावरही अशाचप्रकारे प्रहार केला जातो. मात्र हिना शेवटपर्यंत टिकते आणि चांगल्या गेमचे प्रदर्शन करते. संपूर्ण दिवस हा गेमच चालतो.दिवसाच्या शेवटी बिग बॉस सांगतो की जे काही टास्क देण्यात आले होते ते मर्यादितच होते आणि सर्वांनाच ते सहन करायचे होते. विकासने जो पुनिशवर अटॅक केला ते योग्य नव्हते, यावरून त्याला कॅप्टन पदावरुन काढले जाऊन जेलमध्ये डांबले जात आहे. शिवाय पुढील काही काळासाठी पुनिशला कॅप्टनशिप दिली जात आहे. आणि घराच्या सर्व चाव्या पुनिशच्या हातात सोपवण्याचेही विकासला आदेश दिले जातात. असा होता आजचा दिवस.