Bigg Boss 10 : सलमान खानच्या दराऱ्यापुढे दबला बिग बॉसचा आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 14:12 IST
सद्यस्थितीत बॉलिवूडवर हुकूमत गाजविणारा दबंग स्टार सलमान खान याच्या दराऱ्यापुढे चक्क बिग बॉसचा आवाज दबला आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाºया ...
Bigg Boss 10 : सलमान खानच्या दराऱ्यापुढे दबला बिग बॉसचा आवाज
सद्यस्थितीत बॉलिवूडवर हुकूमत गाजविणारा दबंग स्टार सलमान खान याच्या दराऱ्यापुढे चक्क बिग बॉसचा आवाज दबला आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाºया बिग बॉस शोच्या फिनालेमध्ये स्वामी ओम आणि प्रियंका जग्गा यांना बोलाविले जाण्याच्या चर्चेवरून संतप्त झालेल्या सलमानने निर्मात्यांना असे काही खडसावले की, ज्यामुळे त्यांना या दोघांना फिनालेमध्ये एंट्री देण्यास स्पष्ट शब्दात नकार द्यावा लागला. घरातील सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या स्वामी ओम आणि प्रियंका जग्गा यांची शोमधून सलमानने हकालपट्टी केली होती. आपल्या खास शैलीत त्याने दोघांना घराबाहेर काढले होते. त्याचबरोबर पुन्हा कधी ते बिग बॉस शो किंवा कलर्स चॅनेलवर दिसणार नाहीत, असा दमही दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी हाती आलेल्या माहितीनुसार बिग बॉसचे निर्माते या दोन्ही वादग्रस्त स्पर्धकांना फिनालेमध्ये सहभागी होऊ देणार असल्याची माहिती समोर आली होती. फिनालेसाठी स्वामी ओम याचे नाव तर निश्चित समजले जात होते. त्याचदरम्यान सलमान हा जोधपूर न्यायालयाच्या प्रकरणात व्यस्त असल्याने त्याने निर्मात्यांच्या या भूमिकेवर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास तत्परता दाखविली नव्हती. जोधपूर खटल्यात त्याची निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याने बिग बॉस शोच्या निर्मात्यांचा चांगलाच समाचार घेतला. स्वामी ओम आणि प्रियंका जग्गासारख्या व्यक्तींना तुम्ही फिनालेमध्ये एंट्री का देता, असा जाब विचारत त्याने निर्मात्यांना धारेवर धरले. Also Read : Confirm : बिग बॉसच्या ग्रॅण्डफिनालेला स्वामी ओम राहणार उपस्थितBigg Boss 10 : ग्रॅण्डफिनालेला सलमान खान करणार Boycottसलमानचा संतप्त अवतार बघून निर्मात्यांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला. परंतु याविषयी बिग बॉसच्या निर्मात्यांकडून कुठल्याही प्रकारचा खुलासा केला गेला नसल्याने याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. तर दुसरीकडे स्वामी ओम फिनालेमध्ये सहभागी होण्यासाठी कसोशिने प्रयत्न करीत असून, सलमानवर आरोपांची बरसात करण्यास कुठलीच कसर सोडत नसल्याचे दिसत आहे. स्वामी ओम आणि प्रियंका जग्गा यांची गलिच्छ वर्तणुकीमुळे घरातून हकालपट्टी करण्यात आली होती. घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी बिग बॉसच्या निर्मात्यांसह सलमानवर वाट्टेल ते आरोप केले होते. स्वामी ओमने तर सर्व मर्यादा पार करीत सलमानचे उणेदुणे काढले. अशातही स्वामी ओमला फिनालेमध्ये सहभागी होण्यास संधी दिल्यास सलमानच्या प्रतिष्ठेलाच ठेच लागेल यात दुमत नाही.