बिग बॉस सीझन १० च्या शेवटच्या आठवड्यासाठी रोहन मेहरा आणि बानी जे नॉमिनेट झाले होते. दोघेही स्ट्रॉँग स्पर्धक मानले जात असल्याने त्यांच्यात जोरदार लढत होण्याची शक्यता होती. परंतु रोहनच्या तुलनेत बानीचा पगडा भारी पडल्याने त्याला घराबाहेर व्हावे लागले. रोहनचा घरातील प्रवास अतिशय मजेशीर राहिला आहे. मनवीर गुर्जर अन् त्याच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर लोपामुद्रा राऊत हिच्याबरोबरची त्याची मैत्रीही चर्चिली गेली; मात्र एका टास्कदरम्यान त्याने स्वामी ओम यांना धक्का देत त्यांच्याशी हातापायी करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला संपूर्ण शोमध्ये नॉमिनेट करण्याची बिग बॉसने शिक्षा सुनावली होती. त्यामुळे शेवटच्या आठवड्यात तो बानी जे बरोबर नॉमिनेट होता.Tune in now to see what’s cooking in the house with the 'BB Dhaaba' task! #BB10GrandFinalepic.twitter.com/mTrkInaDNU— Bigg Boss (@BiggBoss) January 24, 2017
Bigg Boss 10 : रोहन मेहरा बिग बॉसच्या फिनाले रेसमधून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 14:17 IST
बिग बॉस सीझन १० चा हा शेवटचा आठवडा असून, फिनालेच्या दोन दिवस अगोदरच या शोच्या ट्रॉफीचा प्रबळ दावेदार समजला ...
Bigg Boss 10 : रोहन मेहरा बिग बॉसच्या फिनाले रेसमधून बाहेर
बिग बॉस सीझन १० चा हा शेवटचा आठवडा असून, फिनालेच्या दोन दिवस अगोदरच या शोच्या ट्रॉफीचा प्रबळ दावेदार समजला जाणारा रोहन मेहरा घराबाहेर पडणार आहे. मध्यंतरीच्या काळात या शोचा विजेता रोहन मेहराच असेल अशी चर्चा रंगली होती; मात्र ऐन फिनालेच्या दोन दिवस अगोदरच त्याचा घरातील प्रवास संपल्याने, आता बिग बॉस ट्रॉफीचा दुसराच सदस्य दावेदार असेल हे निश्चित झाले आहे. गेल्या मंगळवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये रोहन मेहरा, बानी जे, लोपामुद्रा राऊत मनू पंजाबी आणि मनवीर गुर्जर शेफ टास्कमध्ये भाग घेतला होता. या टास्कनंतर बिग बॉसने मध्यरात्री सरप्राइज एविक्शन करून रोहन मेहराचा घरातील प्रवास संपल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर तो फिनालेच्या रेसमधून बाहेरही पडला आहे. खरं तर या टास्कचा आणि एविक्शनचा काहीही संबंध नसून, व्होटच्या आधारेच तो घराबाहेर पडल्याचे बिग बॉसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केआरकेची भविष्यवाणी ठरली खोटीबिग बॉसचा एक्स स्पर्धक केआरके अर्थात कमाल खान हा नेहमीच काहीतरी भविष्यवाणी करून वाद ओढवून घेत असतो. अशीच भविष्यवाणी त्याने रोहन मेहराबाबत केली होती. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्याने रोहन मेहराच या सीझनचा विनर असेल असे म्हटले होते; मात्र रोहन मेहरा घराबाहेर पडल्याने त्याची ही भविष्यवाणी सपशेल खोटी ठरली आहे.