Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग बॉस’चे EX Contestant स्वामी ओम यांचे निधन, 3 महिन्यापूर्वी झाली होती कोरोनाची लागण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 14:25 IST

'बिग बॉस १०' सिझनमध्ये स्वामी ओम कॉमनर म्हणून सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 'बिग बॉस' या शोमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. स्वयंघोषित बाबा स्वामी ओम प्रचंड वादग्रस्तही ठरले होते.

'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वातील स्पर्धक व वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले ओम स्वामी यांचे निधन झाले आहे.त्यांनी आपल्या निवासस्थानी डीएलएफ अंकुर विहार येथे अखेरचा श्वास घेतला. सगळ्यात वादग्रस्त समजला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस', या शोमध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धकाला एक वेगळी ओळख मिळते. 'बिग बॉस १०' सिझनमध्ये स्वामी ओम कॉमनर म्हणून सहभागी झाले होते.  गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 'बिग बॉस'  या शोमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. स्वयंघोषित बाबा स्वामी ओम प्रचंड वादग्रस्तही ठरले होते. 

त्यांना तीन महिन्यांपूर्वी कोरोनाचीही लागण झाली होती, त्यानंतर अर्धांगवायूचा झटका आल्याची माहितीस समोर येत आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर प्राणज्योत मालवली. बिग बॉस शोमधून बाहेर आल्यानंतर स्वामी ओम चर्चेत होते. वेगवेगळ्या कारणांमुळे ते सतत चर्चेत असायचे. 

बिग बॉस सीझन-१० चे स्पर्धक राहिलेल्या स्वामी ओमने घरातील महिला स्पर्धकांशी अतिशय लाजिरवाणी अशी वर्तणूक केली आहे. त्यामुळे त्यांची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली होती. स्वामी ओम जेवढे घरात वादग्रस्त होते, तेवढेच बाहेरील दुनियेतही वादग्रस्त ठरले होते.

बिग बॉस नंतर स्वामी ओमचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक मुलगी त्याच्यासोबत बिकिनीमध्ये दिसली. त्याच वेळी स्वामी ओम तपस्या करताना दिसले. यावरही बरेच वादंग झाले होते. त्यानंतर स्वामी ओम यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. 2019 मध्ये स्वामी ओम यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

टॅग्स :बिग बॉससलमान खान