Join us

Bigg Boss 10 Contestant :लहानपणी अशी दिसायची लोपामुद्रा राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 11:15 IST

बिग बॉस या रियालिटी शोमुळे लोपामुद्रा राऊत हे नाव घराघरात पोहचलं. लोपामुद्राच्या विविध अदा रसिकांनी बिग बॉस या शोमध्ये ...

बिग बॉस या रियालिटी शोमुळे लोपामुद्रा राऊत हे नाव घराघरात पोहचलं. लोपामुद्राच्या विविध अदा रसिकांनी बिग बॉस या शोमध्ये पाहिल्या आहेत. तिच्या ग्लॅमरस लूकसोबतच तिच्या मादक अदांचीही तितकीच चर्चा झाली. बिग बॉस या रियालिटी शो सोबतच मिस इंडिया, मिस दिवा या ब्युटी कॉन्स्टेमध्येही तिनं सहभाग घेतला. 2016 साली झालेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेन्टंस या स्पर्धेत तिनं भारताचं प्रतिनिधीत्व केलं आणि तिथं ती सेकंड रनर-अप राहिली. मॉडेलिंगच्या दुनियेतून आल्यामुळे हॉट आणि सेक्सी अंदाज लोपामुद्रासाठी काही नवा नाही. सोशल मीडियावरही लोपामुद्राचे हॉट आणि सेक्सी अंदाजातील फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. मात्र हॉट आणि तितकीच सेक्सी दिसणा-या लोपामुद्राचा बालपणीचा अवतार पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. तिचे बालपणीचे फोटो पाहून आजची लोपामुद्रा ती नव्हेच असंही तुम्हाला वाटेल.तिच्या एका बालपणीच्या फोटोमध्ये ती आपल्या कुटुंबीयांसोबत पाहायला मिळते.यांत तिचे आई-बाबा आणि बहिणही आहेत. दुस-या एका फोटोत आईसोबत गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये लोपामुद्रा पाहायला मिळतेय.टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा लोपामुद्राला काही तरी वेगळं करण्याची इच्छा आहे. सध्या वेबसिरीजला तरुणाईची चांगली पसंती मिळत आहे. तरुणाईची आवड आणि वेबसिरीजला मिळत असलेला प्रतिसाद पाहता काहीतरी हटके वेबसिरीज करायला नक्की आवडेल असं लोपामुद्रा हिने म्हटलं आहे. लोपामुद्रानं अगदी कमी वयातच मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलं होतं. त्यामुळे आपसुकच तिच्यात हा बदल घडून आला. लोपामुद्राने 2013 साली मिस नागपूर हा किताबही जिंकला. त्यामुळे सोशल मीडियावर लोपामुद्राचा बालपणीचा लूक आणि हॉट-सेक्सी अंदाज फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.