गेल्या वर्षात अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले. आता या नववर्षाच्या सुरुवातीलाही काही सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. बिग बॉसमधून प्रसिद्धी मिळवलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडलने साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबत तिने चाहत्यांना माहिती दिली आहे. 'बिग बॉस १०' फेम नितिभा कौल हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. फिल्मी स्टाइलने नितिभाने बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला.
साखरपुड्याचे फोटो नितिभाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने बॉयफ्रेंडचा चेहरादेखील दाखवला आहे. नितिभाने या खास क्षणासाठी खास लूक केला होता. तिने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट वन पीस घातला होता. तर तिच्या बॉयफ्रेंडने शर्ट आणि पँट असा पेहराव केला होता. फिल्मी स्टाइलने दोघांनीही साखरपुडा करत फोटोसाठी खास पोझही दिल्या. इतकंच नव्हे तर साखरपुडा झाल्यानंतर निभिता आणि बॉयफ्रेंडने एकमेकांना किसही केलं.
नितिभा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो अनेकदा शेअर करताना दिसायची. पण तिने कधीच त्याचा चेहरा दाखवला नव्हता. एका वर्षाहून जास्त काळ डेट केल्यानंतर आता त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉस १०मध्ये नितिभा दिसली होती.
Web Summary : Bigg Boss 10 fame Nitibha Kaul got engaged in a filmy style. She shared romantic photos with her boyfriend on Instagram, revealing his face after dating for over a year. The model wore a white dress for the occasion.
Web Summary : बिग बॉस 10 फेम नितिभा कौल ने फिल्मी अंदाज में सगाई कर ली। उन्होंने इंस्टाग्राम पर अपने बॉयफ्रेंड के साथ रोमांटिक तस्वीरें साझा कीं, एक साल से अधिक समय तक डेटिंग करने के बाद उसका चेहरा दिखाया। मॉडल ने इस अवसर के लिए सफेद रंग की पोशाक पहनी थी।