Join us
Daily Top 2Weekly Top 5

'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मालिकेत मोठा ट्विस्ट; या प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:07 IST

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi : 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मालिकेत एक रोमांचक वळण येणार आहे.

स्टार प्लसवरील आयकॉनिक मालिका 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' कायम चर्चेत राहिली आहे. आता या मालिकेत एक रोमांचक वळण येणार आहे. कारण या मालिकेत प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामीची एंट्री झाली आहे. गुजराती सिनेमा आणि दूरदर्शनमधील त्याच्या प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा गोस्वामीने लालो, कृष्ण सदा सहायते या भक्तिमय ब्लॉकबस्टरमध्ये साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्याच्या या मालिकेतील एंट्रीमुळे कथानकात नवा ट्विस्ट येणार असल्याचं कळतंय.

दर्जेदार अभिनय शैली आणि उत्तम स्क्रीन प्रेझेन्समुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला श्रुहद गोस्वामी आगामी एपिसोड्समध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या मालिकेतील भूमिकेविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सूत्रांच्या मते त्याच्या मालिकेतील विशेष एंट्रीमुळे सध्या सुरू असलेल्या कथानकावर मोठा परिणाम होणार आहे.

मालिकेतील चढ उतार बघताना या वळणावर श्रुहद गोस्वामींच्या एंट्रीमुळे मालिकेत काय अजून उत्कांवर्धक गोष्ट बघायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्याचे पात्र विराणी कुटुंबातील सुरू असलेल्या गोंधळाशी कसे जोडले जाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्याच्या मालिकेतील विशेष उपस्थितीने कथानकात वेगळा ट्विस्ट निर्माण होणार असून अजून काय ड्रामा अनुभवयाला मिळणार हे बघणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi' series gets a twist: Actor enters

Web Summary : The iconic 'Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi' series is set for a twist with Gujarati actor Shruhad Goswami's entry. Known for his role as Krishna, his arrival promises a significant impact on the storyline and drama.
टॅग्स :स्टार प्लस